तिवस्यात दहा दिवसांत आठ प्रेमविवाह; पोलिसांकडे तीन प्रकरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 05:00 IST2020-02-11T05:00:00+5:302020-02-11T05:00:59+5:30
आपली मुलगी पळून गेली, अमक्याने तिला फूस लावून पळवून नेले, अशा तक्रारी मुलीच्या पित्याकडून केल्या जातात. त्यातील मुलगी अल्पवयीन असल्यास संबंधितांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करून पोलीस मोकळे होतात. ती मुलगी सज्ञान असल्यास पोलिसांकडून मुलगी व पालकांना योग्य तोडगा काढण्यासाठी समोरासमोर बसविले जाते.

तिवस्यात दहा दिवसांत आठ प्रेमविवाह; पोलिसांकडे तीन प्रकरणे
सूरज दाहाट ।
लोकमत न्यूज नेटवर्क
तिवसा : तालुक्यात दहा दिवसांत पळवापळवीतून चक्क आठ प्रेमविवाह झाले आहेत. त्यातील तीन प्रकरणांची स्थानिक पोलिसांत नोंद आहे. अन्य सहा प्रकरणे पोलीस ठाण्यात न पोहोचली नाहीत. या पाच युगुलांनी पळून जात शुभमंगल उरकल्याची माहिती आहे.
आपली मुलगी पळून गेली, अमक्याने तिला फूस लावून पळवून नेले, अशा तक्रारी मुलीच्या पित्याकडून केल्या जातात. त्यातील मुलगी अल्पवयीन असल्यास संबंधितांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करून पोलीस मोकळे होतात. ती मुलगी सज्ञान असल्यास पोलिसांकडून मुलगी व पालकांना योग्य तोडगा काढण्यासाठी समोरासमोर बसविले जाते. मात्र, अनेक प्रकरणांत मुलामुलींचा पवित्रा ‘ जीना सिर्फ तेरे लिए’ असा असतो. त्यामुळे पालक-नातेवाइकांसह पोलिसांचाही नाइलाज होतो. अशाच पठडीतील आठ विवाह अवघ्या दहा दिवसांत तिवसा तालुक्यात उरकले आहेत.
तिवसा पोलीस ठाण्यात अशा तीन प्रकरणांची नोंद घेतली आहे. त्यांच्या प्रेमविवाहास परस्पर संमती होती. त्यांच्याकडे कायदेशीर विवाह प्रमाणपत्र आहे. उर्वरित प्रकरणांची पोलीस यंत्रणेकडे नोंद नाही.
-गोपाल उंबरकर, पोलीस निरीक्षक, तिवसा