दोन दिवसांत आठ मृत्यू, ३४९ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:13 IST2021-03-31T04:13:50+5:302021-03-31T04:13:50+5:30

अमरावती : जिल्ह्यात ४८ तासांत आठ कोरोनाग्रस्तांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने संक्रमित रुग्णांच्या मृत्यूची संख्या ६६८ वर पोहोचली आहे. याच ...

Eight deaths in two days, 349 positive | दोन दिवसांत आठ मृत्यू, ३४९ पॉझिटिव्ह

दोन दिवसांत आठ मृत्यू, ३४९ पॉझिटिव्ह

अमरावती : जिल्ह्यात ४८ तासांत आठ कोरोनाग्रस्तांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने संक्रमित रुग्णांच्या मृत्यूची संख्या ६६८ वर पोहोचली आहे. याच कालावधीत ३४९ अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ४८,३७६ झालेली आहे.

जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा ग्राफ अलीकडे काहीसा माघारला आहे. सोमवारी २४१ व मंगळवारी १०८ अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. याशिवाय सोमवारी सहा व मंगळवारी दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. कोरोना रुग्णांची संख्या या महिन्यात वाढल्याने जिल्ह्याच्या चिंतेत भर पडली आहे.

जिल्हा शल्यचिकित्सकांच्या माहितीनुसार सोमवारी धनकी, यवतमाळ येथील ३९ वर्षीय पुरुष, येथील त्रिभुवन कॉलनीतील ८७ वर्षीय पुरुष, परतवाडा येथील ७५ वर्षीय महिला, कापूसतळणी येथील ६५ वर्षीय महिला, वरुड येथील ९० वर्षीय पुरुष व नेरपिंगळाई येथील ६५ वर्षीय पुरुष तसेच मंगळवारी बडनेरा येथील ६१ वर्षीय पुरुष व परतवाडा येथील ४६ वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने जिल्ह्यात संक्रमितांच्या मृत्यूची संख्या ६६८ वर पोहोचली आहे.

Web Title: Eight deaths in two days, 349 positive