अनधिकृत जाहिरातीवर अंकुश ठेवण्यासाठी दक्षता समिती
By Admin | Updated: December 3, 2014 22:42 IST2014-12-03T22:42:08+5:302014-12-03T22:42:08+5:30
अनधिकृत होर्डिंग्ज, पोस्टर्स लावून चमकोगिरी करणाऱ्यांना आळा बसविणे आणि अनधिकृत जाहिरातीने शहर विद्रूपीकरण करणाऱ्यांवर लगाम लावण्यासाठी महापालिका प्रशासनाने

अनधिकृत जाहिरातीवर अंकुश ठेवण्यासाठी दक्षता समिती
अमरावती : अनधिकृत होर्डिंग्ज, पोस्टर्स लावून चमकोगिरी करणाऱ्यांना आळा बसविणे आणि अनधिकृत जाहिरातीने शहर विद्रूपीकरण करणाऱ्यांवर लगाम लावण्यासाठी महापालिका प्रशासनाने झोननिहाय दक्षता समितीचे गठन केले आहे. तसेच अनधिकृत जाहिरातींच्या तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक सुरु करण्यात आला आहे.
मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिका क्रमांक १५५/ २०११ याविषयी निर्णय देताना न्यायमूर्तींनी ६ आॅगस्ट २०१४ रोजी महापालिका आयुक्तांना अनधिकृत जाहिराती संदर्भात मार्गदर्शक तत्त्वे ठरवून दिले आहेत. न्यायालयाने ठरवून दिल्यानुसार याप्रकरणी कार्यवाही अपेक्षित आहे. त्यानुसार आयुक्त अरुण डोंगरे यांनी बाजार परवाना विभागाला न्यायालयाच्या निर्णयानुसार दक्षता समितीचे गठन व सामान्यांना तक्रारीसाठी सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याचे ठरविले आहे. त्यानुसार तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक १८००- २३३- ६४४० व १८००- २३३- ६४४१ हे सुरु करण्यात आले आहे. अनिधकृत जाहिरातीविरोधी पथक नोडल अधिकारी म्हणून रामदास वाकपांजर हे सहायक अधीक्षक यांच्या पथकाच्या सहकार्यांने अनधिकृत जाहिराती काढून तसा अहवाल दरदिवशी आयुक्तांना कळवतील, असा निर्णय घेतला आहे. तसेच महापालिका पाचही झोनमध्ये दक्षता समिती गठित करण्यात आली आहे. अनधिकृत जाहिरातीबाबत टोल फ्री क्रमांकावर तक्रार आल्यास त्या तक्रारीची शहनिशा करुन घटनास्थळी संबंधित अधिकाऱ्यांना कारवाईचा अहवाल कळवावा लागणार आहे. (प्रतिनिधी)