कुत्र्यांपासून होणाऱ्या संसर्गावर प्रभावी लस तयार होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 22:00 IST2019-04-07T21:58:26+5:302019-04-07T22:00:43+5:30
कुत्र्यांपासून होणाऱ्या संसर्गविरुद्ध लस तयार करण्यासाठी अमरावती येथील शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेतील प्राणीशास्त्र विभागाचे प्राध्यापक मुमताज बेग यांनी मोलाची भूमिका बजावली. आंतरराष्ट्रीय जर्नल ‘ट्रान्सबाऊंडरी इमर्जिंग डीसीसेज’मध्ये त्यांचे संशोधन पेपर प्रसिद्ध झाले आहे.

कुत्र्यांपासून होणाऱ्या संसर्गावर प्रभावी लस तयार होणार
गणेश वासनिक/
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : ‘कॅनाइन डिस्टेंपर वायरस’ डीएनए हा सिक्वेंसिंगशी संबंधित आहे. हा विषाणू पाळीव कुत्र्यांमध्ये आढळतो. बरेचदा हा विषाणू वनक्षेत्रातील सिंह, वाघ, बिबट यांच्यात संक्रमित होतो. काही दिवसांपूर्वी गुजरातच्या गीर मधील पाच सिंहाचा मृत्यू याच विषाणूमुळे झाले. त्यामुळे कुत्र्यांपासून होणाऱ्या संसर्गविरुद्ध लस तयार करण्यासाठी अमरावती येथील शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेतील प्राणीशास्त्र विभागाचे प्राध्यापक मुमताज बेग यांनी मोलाची भूमिका बजावली. आंतरराष्ट्रीय जर्नल ‘ट्रान्सबाऊंडरी इमर्जिंग डीसीसेज’मध्ये त्यांचे संशोधन पेपर प्रसिद्ध झाले आहे.
प्रा. बेग यांनी या समस्येवर मात करण्यासाठी संशोधनात पाळीव कुत्र्यांमधून ‘कॅनाइन डिस्टेंपर वायरस’चे नमुने गोळा केले आणि अत्यंत अधिकृत भारतीय पशुवैद्यकीय संशोधन प्राणीशाळेत त्यांचे डीएनए तपासले गेले. प्रा. बेग यांनी या संशोधनात डीएनए अभ्यास विश्र्लेषक म्हणून काम पाहिले. या संशोधनात भारतातील कुत्र्यांमध्ये प्रसारित होणारा विषाणू युरोप, पूर्व आशिया या सारख्या जगाच्या इतर भागांत आढळणाऱ्या विषाणूपेक्षा खूप वेगळा आहे. यापूर्वी या विषाणुमुळे सेरेन्गेही जंगल पूर्व आफ्रिका येथील ३० टक्के आफ्रिकी सिंहाचे मृत्यू झाले आहेत. भारतात ‘कॅनाइन डिस्टेंपर वायरस’ प्रतिबंधकरिता भरपूर लसेस उपलब्ध आहेत. परंतु, अलीकडे या लसेस अकार्यक्षम ठरत आहेत. तथापि, प्रा. बेग यांचे महत्त्वपूर्ण संशोधन पेपर बरेली, गुवाहाटी आणि हैद्राबाद येथील भारतीय पशुवैद्यकीय संस्थानच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय स्तराच्या संस्थेने प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे येत्या काळात कुत्र्यांपासून होणाऱ्या संसर्गविरु द्ध प्रभावी लस तयार होणार आहे.
कुत्र्यांमधील त्या विषाणूवर प्रतिबंधात्मक लसेस तयार केल्या आहेत. मात्र, त्या फारशा प्रभावी ठरल्या नाहीत. त्यामुळे कुत्र्यांना लस दिल्यानंतरही संसर्गजन्य विषाणू कायम राहतो. आता पहिल्या टप्प्यात डीएएनवर अभ्यास आणि दुसºया टप्प्यात प्रभावी लस तयार केली जाईल.
- मुमताज बेग,
प्राध्यापक, शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, अमरावती