शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापकांसह शिक्षकांची वेतनवाढ रोखली

By admin | Updated: January 19, 2016 00:07 IST

राज्याचे गृहराज्य, सामान्य प्रशासन, विधी व न्याय, संसदीय कामकाजमंत्रीे रणजीत पाटील यांनी सोमवारी महापालिका शिक्षण विभागाला आकस्मिक भेट दिली.

महापालिकेत १९ जणांना कारणे दाखवा : गृहराज्यमंत्र्यांची शिक्षण विभागाला भेटअमरावती : राज्याचे गृहराज्य, सामान्य प्रशासन, विधी व न्याय, संसदीय कामकाजमंत्रीे रणजीत पाटील यांनी सोमवारी महापालिका शिक्षण विभागाला आकस्मिक भेट दिली. शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापकांसह शिक्षक, कर्मचारीच गैरहजर असल्याचे ना. पाटील यांच्या निदर्शनास आले. शिक्षण विभागाचा ढिसाळ कारभार बघून ना. पाटील यांनी संबंधितांची वेतनवाढ व सेवापुस्तिकेत नोंद घेण्याचे निर्देश दिलेत.ना. पाटील सोमवारी सकाळी १० वाजून ३२ मिनिटांनी स्थानिक अंबापेठ स्थित महापालिका शाळा, शिक्षण विभागाला भेट दिल्यानंतर येथील वस्तुस्थिती बघून ते अवाक झाले. शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी सारेच गायब. महापालिका प्रशासनाचा कारभार कसा चालतो तरी कसा ? असा प्रश्न उपस्थित करून ना. पाटील यांनी शिक्षण विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांना पाचारण केले. ना. पाटील यांनी शिक्षण विभाग, शाळांना भेट दिल्याचे कळताच महापौरांच्या बैठकीतून उपायुक्त विनायक औगड, चंदन पाटील तडकाफडकी शिक्षण विभागात कसेबसे पोहोचले.कर्मचाऱ्यांची हजेरी पुस्तके तपासलीअमरावती : ना. पाटील यांनी त्यांना शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची हजेरी पुस्तके तपासण्यास सांगितले. त्यानुसार कर्मचाऱ्यांचे हजेरी पुस्तके तपासली असता एकूण १९ कर्मचारी वेळेत पोहोचले नसल्याचे स्पष्ट झाले. ना. पाटील यांच्या भेटीनंतर शिक्षण विभागाचा अफलातून कारभार उपायुक्त औगड, पाटील यांनी सीसीटीव्ही फुटेजमध्ये तपासला असता वास्तव त्यांच्या लक्षात आले. ना. रणजित पाटील यांनी कामचुकार कर्मचाऱ्यांच्या दोन वेतनवाढी रोखून सेवापुस्तिकेत नोंद घेण्याचे निर्देश उपायुक्तांना दिले. त्यानुषंगाने उपायुक्त चंदन पाटील यांनी शिक्षण विभागाशी संबंधित १९ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. या कारवाईने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. ना. रणजित पाटील यांनी महापालिका क्षेत्रात कारवाई करण्यास प्रशासनास भाग पाडल्याने चर्चांना सोमवारी उधाण आले होते.शिक्षणाधिकाऱ्यांचा राजीनामा अर्जना. पाटील शिक्षण विभागाची झाडाझडती घेत नाहीत तोच शिक्षणाधिकारी वाकोडे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा पाठविला. वाकोडे हे सेवानिवृत्त अधिकारी आहेत. आयुक्त गुडेवार यांनी केलेल्या पदभरतीत त्यांच्यावर शिक्षणाधिकारी पदाची धुरा सोपविली होती. मात्र, वाकोडे यांनी शिक्षणाधिकारी पदापासून मुक्त होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. वाकोडे यांच्या राजीनामा अर्जावर प्रशासनाने अद्याप कोणतीही कारवाई केली नाही, हे विशेष.यांना बजावल्या कारणे दाखवा सोमवारी ना. पाटील यांनी शिक्षण विभागात धाड टाकून गैरहजर कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार दिवाकर लाकडे, संजय वडुरकर, क्षमा कुसरे, दीपक मोंढे, भारत वाघमोडे, योगेश राणे, सुषमा दुधे, दीपाली थोरात, धीरज सावरकर, स्मिता रामटेके, वैशाली सोळंके, सोनिया पवार, कैलास कुलूट, मोरेश्वर चव्हाण, उज्ज्वल जाधव, सुजाता राजनकर, गिरीश लाकडे, कुमुदिनी देवडे व संगीता मोरे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत.सोमवारी महापालिका शिक्षण विभागाच्या कार्यालयात भेट दिली असता बहुतांश अधिकारी, कर्मचारी व शिक्षक गायब असल्याचे निदर्शनास आले. हजेरी पुस्तक तपासले तर स्वाक्षऱ्या नव्हत्या. कर्मचारी गायब असल्याचे सीसीटीव्ही कॅ मेऱ्यात कैद झाले आहे. दोन वेतनवाढी रोखून सेवापुस्तिकेत नोंद घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.-रणजित पाटील, गृहराज्यमंत्री, महाराष्ट्र