समाज ऋणाच्या उत्तराईसाठी आलो शिक्षण क्षेत्रात
By Admin | Updated: May 22, 2016 00:11 IST2016-05-22T00:11:58+5:302016-05-22T00:11:58+5:30
लहानपणापासूनच समाजासाठी काहीतरी विशेष करावे, असे वाटत होते.

समाज ऋणाच्या उत्तराईसाठी आलो शिक्षण क्षेत्रात
प्रवीण पोटे : पीआर पोटे ग्रुप आॅफ इंन्स्टिट्युटमधील विद्यार्थ्यांचा गौरव
अमरावती : लहानपणापासूनच समाजासाठी काहीतरी विशेष करावे, असे वाटत होते. शिक्षणक्षेत्रात गेले नऊ वर्षे कसे गेले हे कळलेच नाही सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी व समाजाच्या उत्तरदायीत्वासाठी शिक्षणक्षेत्रात आपणं कार्य करीत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले.
ते येथील सांस्कृतिक भवन येथे शनिवारी पीआर पोटे पाटील ग्रृप आॅफ इन्स्टिट्यूशनतर्फे आयोजित आॅफर लेटर डिस्ट्रीब्युशन समारंभाप्रसंगी बोलत होते. यावेळी पालकंमंत्र्यांनी विद्यार्थ्यांशी दिलखुलास चर्चा केली. ते म्हणाले, चांगला विद्यार्थी घडावा तो देशाचा चांगला नागरिक व्हावा यासाठी वेळप्रसंगी विद्यार्थ्यांना शिक्षा केली असेल त्याला प्रसादही मिळाला असेल. परंतु आज जे महाविद्यालयातून विद्यार्थी घडत आहेत त्यांना देशातील व विदेशातील अनेक नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट मिळत आहे. ज्या विद्यार्थ्याला सहजस्थितीत नोकरीची गरज नसेल त्यांनी प्रशासकीय सेवेकडे वळावे व अमरावतीच्या मातीचे नाव मोठे करावे महाराष्ट्रात चांगले बदल घडवून आणायचे असेल तर या मातीतील विद्यार्थी पुढे आले पाहिजे. यावेळी व्यासपीठावर पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, पीआर पोटे ग्रुपचे उपाध्यक्ष दिलीप निंभोरकर, संचालक डि.जी. वाकोडे, प्राचार्य एस.डी. वाकोडे, उपप्राचार्य महंमद झुयर, मोनिका उपाध्य आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी यावेळी पोलीस आयुक्त दत्तात्रेय मंडलिक यांनी विद्यार्थ्यांना मौलिक मागदर्शन करून देशाचे चांगले नागरिक होण्याचे आवाहन त्यांनी केले. २३९ विद्यार्थ्यांना नामांकित कंपनीत रोजगाराची संधी महाविद्यालयाने उपलब्ध करून दिली आहे.
यावेळी या विद्यार्थ्यांना आॅफर लेटर डिस्ट्रीब्यूशन देऊन गौरविण्यात आले. यावेळी अनेक प्राध्यापकांचा सत्कारही करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन सागर सोनखासकर, स्नेहा पांडे, आभार प्रशांत ठोंबरे यांनी केले. यावेळी सर्व प्राध्यापक वृंद, कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
मी दहावीत सहावेळा शाळा बदलणारा नामवंत विद्यार्थी
माझे शिक्षण अतिशय मजेशीर झाले. विरंगुळा करीत ना. पोटे म्हणाले, वडिलांच्या नोकरीच्या बदलीमुळे का होेईना दहावीत शिक्षण घेताना सहा शाळा बदलाव्या लागल्या. नंतर मी सातारा येथे सैनिकी स्कूलमध्ये शिकलो. असा मी नामवंत विद्यार्थी होतो. आज हा विद्यार्थी महाराष्ट्रात नामवंत ठरला आहे. यावर उपस्थितांमध्ये हास्याचे फवारे उडाले. जिद्द व चिकाटीने आपणही कुठलेही यश संपादन करू शकता, असा मौलिक सल्ला व विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा संदेशच त्यांनी उपस्थिताना दिला.