शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

प्राण्यांना रंग लावल्यास शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 22:16 IST

आनंद व उत्साहाचे प्रतीक असलेला होळी सण अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. लहान मंडळी तर आठवड्याभरापासून खरेदी आणि इतर तयारीत व्यस्त आहेत. या पार्श्वभूमीवर वसा संस्थेने सोशल मीडियावर जनजागृतीपर मार्गदर्शन केले आहे. प्राण्यांना रंग लावल्यास शिक्षेची तरतूद असून, हिडीस प्रदर्शन न करता नैसर्गिक रंगांनी रंगपंचमी खेळा, असे आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे.

ठळक मुद्देवसा संस्थतर्फे जनजागृती : नैसर्गिक रंगांनी खेळा रंगपंचमी

वैभव बाबरेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आनंद व उत्साहाचे प्रतीक असलेला होळी सण अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. लहान मंडळी तर आठवड्याभरापासून खरेदी आणि इतर तयारीत व्यस्त आहेत. या पार्श्वभूमीवर वसा संस्थेने सोशल मीडियावर जनजागृतीपर मार्गदर्शन केले आहे. प्राण्यांना रंग लावल्यास शिक्षेची तरतूद असून, हिडीस प्रदर्शन न करता नैसर्गिक रंगांनी रंगपंचमी खेळा, असे आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे.समाजात अनेक जण सणाच्या अतिउत्साहात रस्त्यावरील बेवारस श्वान, मांजरी, गाय, बैल, गाढव आणि वन्यजिवामध्ये विशेषत: माकडांना गंमत म्हणून रंग लावतात. या रंगामुळे प्राण्यांना अंधत्व येऊ शकते. त्यांना त्वचेचे दुर्धर आजार होऊ शकतात. त्यामुळे प्राण्यांसोबत होळी न खेळण्याचे आवाहन ठकसेन ऊर्फ तुषार इंगोले व शुभम सांयके यांनी केले आहे.रस्त्यावरील बेवारस प्राण्यांना रंग लावल्यास, त्यांच्या अंगावर होळीतील गरम पाणी टाकल्यास किंवा त्यांना इतर कोणताही त्रास दिल्यास, हा प्रकार प्राणी क्रूरता कायदा १९६० आणि हाच प्रकार वन्यजिवाबाबत झाल्यास वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ सुधारणा कायदा २००२ नुसार शिक्षेस पात्र आहे, अशी माहिती वसाचे अ‍ॅनिमल रेस्क्यूअर अभिजित दाणी यांनी दिली.रासायनिक रंगांचे अनेक दुष्परिणामरासायनिक रंगांचे अनेक दुष्परिणाम आहेत. लाल रंगात मर्क्युरी सल्फाइटचा वापर होतो. यामुळे लकवा, मेंदूची वाढ खुंटणे, कर्करोग असे आजार जडतात. काळ्या रंगासाठी लेड आॅक्साइड वापरले जाते. यामुळे त्वचेला खाज, मूत्रपिंडाचे विकार बळावतात. हिरव्या रंगात कॉपर सल्फेट मोठ्या प्रमाणात असते. डोळ्यांची खाज व त्यातून पाणी येण्याचे प्रकार यातून घडतात. निळा रंग पार्शियन ब्लू या रसायनाच्या वापरातून बनविले जाते. त्यामुळे त्वचेचे विकार होतात. चांदी रंग अल्युमिनियम ब्रोमाइडने बनविला जातो. त्वचेचा कर्करोग होण्याची भीती यामुळे असल्याचे संस्थेचे मुकेश वाघमारे यांनी सांगितले.आय क्लीन अमरावतीतर्फे ओम गोसटकरच्या आठवणींना उजाळानैसर्गिक रंग तयार करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा निसर्गप्रेमी ओम गोसटकर याच्या आठवणींना आय क्लीन अमरावतीच्या चमूने उजाळा दिला. रविवारी आय क्लिन अमरावतीच्या चमूने छत्री तलाव बगीचा परिसरात नैसर्गिक रंगाचे स्टॉल लावून ओमच्या स्मृती जागविल्या पर्यावरणाविषयी जनजागृतीत ओमचे मोलाचे सहकार्य अमरावतीकरांना लाभले होते. त्याच्या संपर्कात येणाऱ्या युवांना पर्यावरणाचा ध्यास त्याने लावला होता. आय क्लिन अमरावतीचे शंतनु पाटीलसह अन्य मित्रमंडळींनी त्याच्या आठवणींना उजाळा दिला.थोड्याशा मौजेसाठी रासायनिक रंगाने होळी खेळून आपल्या आरोग्यासोबत खेळ करणे ही योग्य बाब नाही. लहानग्यांना या रासायनिक रंगाबद्दल माहिती नाही. तेव्हा घरातील मोठ्या आणि जबाबदार व्यक्तींनी लहानग्यांना नैसर्गिक रंग खेळायला द्यायला हवे.- रोहित रेवाळकर, निसर्गप्रेमी