लसणापूर, कृष्णापूरच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

By Admin | Updated: July 3, 2016 00:11 IST2016-07-03T00:11:30+5:302016-07-03T00:11:30+5:30

पावसाळ्यात साऊर ते लसणापूर, कृष्णापूर मार्गावरून नाल्याचे पाणी वाहत असल्याने ज्या गावातील ६० ते ७० विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसान सहन करावे लागते.

Education losses to students of LSN, Krishnapur | लसणापूर, कृष्णापूरच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

लसणापूर, कृष्णापूरच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

पावसाचा फटका : रस्त्यावरून वाहते नाल्याचे पाणी
संतोष शेंडे  टाकरखेडा
पावसाळ्यात साऊर ते लसणापूर, कृष्णापूर मार्गावरून नाल्याचे पाणी वाहत असल्याने ज्या गावातील ६० ते ७० विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसान सहन करावे लागते. यासंदर्भात कित्येक तक्रारी देऊनही या मार्गावर पुलाचे कामदेखील मंजूर झाले नाही.
लसणापूर, कृष्णापूर येथे उच्च शिक्षणाची सुविधा नसल्याने गावातील विद्यार्थ्यांना ५ कि़मी अंतरावर असलेल्या साऊर येथे शिकण्याकरिता जावे लागते. या मार्गावर वाहतुकीची सुविधा नसल्याने कित्येक विद्यार्थी पायदळ प्रवास करतात. पावसाळयात लसणापूर ते साऊर या मार्गावरील नाल्यावरून पाणी वाहते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प होते. विद्यार्थ्यांकरिता तर शाळेत जाण्याचा मार्गच बंद झाल्याने त्यांना शैक्षणिक नुकसान सोसावी लागते. यासंदर्भात कित्येकदा तक्रारी देण्यात आल्या परंतू साधा पुलदेखील अद्याप या मार्गावर मंजूर झाला नाही.

Web Title: Education losses to students of LSN, Krishnapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.