शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

चिखलदऱ्याच्या विकासाला ‘इको सेन्सेटिव्ह झोन’चे ग्रहण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2020 05:19 IST

केंद्र शासनाच्या सन २०१६ च्या राजपत्रान्वये चिखलदरा शहरासह संपूर्ण चिखलदरा तालुका इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : चिखलदऱ्याच्या विकासाला इको सेन्सेटिव्ह झोनचे ग्रहण लागले आहे. यातच वन व वन्यजीव विभागाच्या वनाधिकाऱ्यांकडून सिडकोविरुद्ध दोन स्वंतत्र गुन्हे दाखल झाल्यामुळे विकासकामांतील अडचणी वाढल्या आहेत. चिखलदरा विकास आराखड्यातील मौजा शहापूर ते मौजा मोथा (मखंजी रोड) या मार्गाचे काम थांबविण्यात आले आहे.

केंद्र शासनाच्या सन २०१६ च्या राजपत्रान्वये चिखलदरा शहरासह संपूर्ण चिखलदरा तालुका इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये आहे. पर्यावरण संरक्षण अधिनियमांतर्गत वाणिज्यिक खनन, स्टोन क्रशर, रस्ते, पक्के बांधकाम तसेच लेआऊट, एनए प्लॉट बांधकाम व पर्यावरणास धोका निर्माण होईल, अशा कामांना इको सेन्सेटिव्ही झोनमधील संवेदनशील वनक्षेत्रात आणि वनक्षेत्रालगत मनाई करण्यात आली आहे. या क्षेत्रात घनकचरा टाकण्यास बंदी आहे. या क्षेत्रात कुठलेही काम करण्यापूर्वी वन व वन्यजीव विभागासह राज्य शासनाची, राष्ट्रीय वन्यजीव संस्थेची पूर्वपरवानगी बंधनकारक आहे.चिखलदरा शहरासह लगतच्या परिसराच्या विकासाची जबाबदारी सिडकोवर आहे. सिडकोने त्याकरिता चिखलदरा विकास आराखडा बनविला आहे. त्यातील काही कामे सिडकोने सुरू केली आहेत. काही सुरू होणार          आहेत. दरम्यान, इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये, क्षेत्रात कोणत्याही प्रकारचा विकास आराखडा बनविताना, डीपी तयार करताना व  अंमलबजावणी करताना इको सेन्सेटिव्ह व्यवस्थापन योजनेसोबत त्यास समाकलित (एकरूप) करणे आवश्यक असल्याचे वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

मखंजी रोडचिखलदरा विकास आराखड्यातील मौजा शहापूर ते मौजा मोथा (मखंजी) रस्ता हा मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत मेळघाट वन्यजीव विभाग, परतवाडाच्या बफर क्षेत्रातील वनखंड क्रमांक ४६, ४७ च्या हद्दीवरून जात आहे. यात ३.५७ हेक्टर वनक्षेत्र बाधित होत आहे. हाच रस्ता मेळघाट प्रादेशिक वनविभाग, परतवाडा अंतर्गत वनखंड क्रमांक २१, २२ मधूनही जात आहे आणि हे क्षेत्र इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये येत असल्यामुळे मेळघाट वन्यजीव विभाग, परतवाडा आणि मेळघाट प्रादेशिक वनविभाग परतवाडा अंतर्गत सिडकोविरुद्ध दोन स्वतंत्र गुन्हे वनाधिकाऱ्यांनी दाखल केले आहेत. या अनुषंगाने मेळघाट वन्यजीव विभागाच्या विभागीय वनाधिकारी पीयूषा जगताप यांनी २३ ऑक्टोबर रोजी पत्राद्वारे सिडकोचे प्रशासक तथा कार्यकारी अभियंता यांना अवगत केले आहे.

टॅग्स :Chikhaldaraचिखलदरा