खा. संभाजीराजे यांनी आक्रोश मोर्चाचे नेतृत्व करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:09 IST2021-06-22T04:09:47+5:302021-06-22T04:09:47+5:30

मंत्रालयावरील मोर्चा कोणत्याही परिस्थितीत काढण्याचा निर्धार चांदूर बाजार - राजर्षी शाहू महाराजांनी मागासवर्गीयांना ५० टक्के आरक्षण दिले. त्यांचा ...

Eat. Sambhaji Raje should lead the Akrosh Morcha | खा. संभाजीराजे यांनी आक्रोश मोर्चाचे नेतृत्व करावे

खा. संभाजीराजे यांनी आक्रोश मोर्चाचे नेतृत्व करावे

मंत्रालयावरील मोर्चा कोणत्याही परिस्थितीत काढण्याचा निर्धार

चांदूर बाजार - राजर्षी शाहू महाराजांनी मागासवर्गीयांना ५० टक्के आरक्षण दिले. त्यांचा कित्ता गिरवित खा. संभाजी राजे यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या जयंती दिनी २६ जूनच्या मागासवर्गीयांच्या आक्रोश मोर्चाचे नेतृत्व करावे, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव य. आंबेडकर यांनी केले. आरक्षण हक्क कृती समितीच्या २० जून रोजी दादर स्थित डॉ. आंबेडकर भवन येथे झालेल्या ॉविभागीय बैठकीत त्यांनी हे आवाहन केले.

बैठकीत आनंदराज आंबेडकर यांनी आक्रोश मोर्चाला सक्रिय पाठिंबा दिल्याचे रिपब्लिकन सेनेचे रमेश जाधव यांनी जाहीर केले. मुंबई विद्यापीठाचे माजी कुलसचिव दिनेश कांबळे, संदेश वाघ, भारत वानखडे, आर.डी. सोनकर, महेश भाट, सुनील चौहान, बबन जाधव, प्रमोद मोरे आदींनी २६ जूनच्या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले.

Web Title: Eat. Sambhaji Raje should lead the Akrosh Morcha