सफरचंद खा, पण जपून
By Admin | Updated: August 18, 2014 23:13 IST2014-08-18T23:13:58+5:302014-08-18T23:13:58+5:30
मानवी जीवन सुदृढ रहावे, यासाठी जेवणात रोज एक सफरचंद खाणे अगत्याचे आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. मात्र, चकाकणारे सफरचंद खाणे आरोेग्यासाठी घातक ठरू शकते. सफरचंदावरील चकाकी

सफरचंद खा, पण जपून
मेणाचा लेप : किडनीवर संभवतोे अनिष्ट परिणाम
इंदल चव्हाण - अमरावती
मानवी जीवन सुदृढ रहावे, यासाठी जेवणात रोज एक सफरचंद खाणे अगत्याचे आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. मात्र, चकाकणारे सफरचंद खाणे आरोेग्यासाठी घातक ठरू शकते. सफरचंदावरील चकाकी टिकून राहण्यासाठी त्यावर लावण्यात येणारे मेणाच्या लेपाचा परिणाम थेट किडनीवर होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
सफरचंद हे फळ लवकर खराब होणारे आहे. ते झाडावर असताना खराब होऊ नये, म्हणून त्यावर नैसर्गिकरित्या मेणासारखा पांढरा द्रव येतो; परंतु हे फळ तोडल्यानंतर व्यापारांना विकताना सफरचंद चकचकीत दिसावे म्हणून त्याला कापडाने पुसण्यात येते. त्यामुळे त्यावरील आवरण निघून जाते.त्यामुळे ते खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे आयात-निर्यात करताना सफरचंद फ्रेश दिसावे, यासाठी ते मेणाच्या पाण्यात बुडविले जाते. नंतरच ते पेटीत भरले जाते. ही प्रक्रिया एक्सपोर्ट करताना होते. याला रितसर परवानगी आहे.
ताजेपणावर जाऊ नका
फलाहार घेणे शरीरासाठी लाभकारी आहे; मात्र, फळांचा दर्जा राखणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे चकचकीत दिसणारे व स्वस्त दिसणारे फळ खरेदी करणे योग्य ठरत नाही. कधीकधी ते शरीरासाठी हानीकारकही ठरू शकते.
'स्लो पॉयझन'
सफरचंदावरील मेम पोटात गेल्याने त्याचा किडनीवर परिणाम होऊन प्रतिकारशक्ती कमी होते जाते. त्यामुळे किडन्या कमकुवत होतात. तसेच पचनशक्ती देखील कमी होऊ लागते. त्यामुळे असे मेणयुक्त सफरचंद खाल्ल्याने शरीरावर हळूहळू विपरीत परिणाम होतो. त्यामुळे आल्याने स्लोपॉयझन असल्याचे सिद्ध होत आहे.