शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात हिंदू नेत्याची अपहरण करून निर्घृण हत्या, भारताने केला तीव्र निषेध
2
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? आम्हाला काहीच फरक पडणार नाही : शिंदेसेना
3
आजचे राशीभविष्य - २० एप्रिल २०२५, सर्व दृष्टींनी लाभदायी दिवस, सामाजिक क्षेत्रात सक्रीय राहाल
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटला; निकाल लागणार ८ मे रोजी, अनेक अडथळे पार करत १७ वर्षांनंतर सुनावणी पूर्ण
5
जमीन मोजणी हरकतीवर आता केवळ दोनच अपील, मोजणी नकाशे अपलोड झाल्यानंतरच अंतिम निकाल
6
जेलमधून बाहेर येताच त्याने युवतीला पुन्हा पळवून नेले, तलवारी-रॉडने घरावर केला हल्ला
7
राजची साद अन् उद्धवचा प्रतिसाद; मराठीच्या धुरळ्यात ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा
8
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण: हॉस्पिटलच्या व्यवहारातून बेदखल केल्याने होता तणाव
9
मित्राला वाचविताना दोन सख्ख्या भावांनी गमावला जीव; वेळास समुद्रकिनाऱ्यावर तिघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू
10
अवघ्या १७ दिवसांत ८३१ टन हापूस निर्यात; अमेरिकेला सर्वाधिक आंबा रवाना, युरोपाचीही पसंती
11
अवयवदात्याची स्वॅप रजिस्ट्री तयार करा, केंद्राच्या ‘नोटो’कडून सर्व राज्यांना सूचना
12
पावणेपाच लाखांचा घोटाळा; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीत बनावट कागदपत्रे, रुग्णनोंदी आढळल्या
13
अँटालिया स्फोटके प्रकरण: पोलिस अधिकारी काझीच्या दोषमुक्ततेस कोर्टाचा नकार, गुन्हेगारी कटाचा आरोप
14
कॅनडात बस स्टॉपवर भारतीय तरुणीची गोळीबारात हत्या; हल्लेखोरांना दुसऱ्यावर चालवायची होती गोळी
15
"ऑफर देणारे, अटी ठेवणारेही तेच, त्यामुळे मी..."; राज-उद्धव एकत्र येण्यावर CM फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
16
"जाऊ दे यार, कामाचं बोला"; राज-उद्धव एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे चिडले
17
मला स्टार्क वैगेरे व्हायचं नाही; ऑस्ट्रेलियन स्टारशी तुलना केल्यावर आवेश खाननं असा दिला रिप्लाय
18
शेकापच्या संतोष पाटलांच्या दोन्ही मुलांचा वेळास बीचवर एकाच वेळी मृत्यू; बहिणीचा मुलगाही सुमद्रात बुडाला
19
"माय नेम इज खान"! LSG साठी आवेशची 'हिरोगिरी' यॉर्करचा मारा करत RR च्या हातून हिसकावून घेतला सामना
20
रशिया-युक्रेन युद्ध थांबले; तीन दिवस युद्धविराम जाहीर, व्लादिमीर पुतिन यांची घोषणा

स्थानिक विकास कामांसाठी प्रत्येक आमदाराला मिळणार एक कोटी ८० लाख रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 12:34 IST

आमदारांना फिलगूड मार्चपर्यंत मिळणार : डीपीसीत जिल्ह्याचा ४१७कोटींचा आराखडा

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : विधानसभा निवडणुकीत पाच आमदार नव्याने निवडून आले आहे. या आमदारांना स्थानिक विकास कामांसाठी मार्चपर्यंत १.८० कोटींचा विकास निधी उपलब्ध होणार आहे. शिवाय तीन आमदार पुन्हा निवडून आले आहेत. त्यांचा यापूर्वीच्या टर्मचा निधी पूर्ण झालेला आहे, म्हणजेच त्यांनादेखील एवढाच निधी मार्चपर्यंत मिळेल. दरम्यान ३१ जानेवारीला पालकमंत्री आढावा घेणार असल्याने नियोजन विकास जिल्हा आराखड्यात व्यस्त आहे.

तिवसा मतदारसंघात राजेश वानखडे, मोर्शी-वरुडमध्ये उमेश यावलकर, अचलपूरमध्ये प्रवीण तायडे, मेळघाटमध्ये केवळराम काळे, तर दर्यापूरमध्ये गजानन लवटे पहिल्यांदा निवडणूक आले. तर, धामणगाव मतदारसंघात प्रताप अडसड, बडनेरात रवी राणा व अमरावतीत सुलभा खोडके पुन्हा विजयी झाल्याने त्यांना मिळणार पाच कोटींचा निधी कायम राहणार आहे,

आरोग्य, रस्ते-पुलासाठी सर्वाधिक ९८.५० कोटी आराखड्यात ७२.७० कोटींची आरोग्य व रस्ते, पुलासाठी ४०, नगरविकास ३४.५२, पशुसंवर्धन ११.७०, वन २७.२३, सहकार ३, ग्रामीण विकास ३०, पाटबंधारे ११, क्रीडा ८, उच्च शिक्षण १६, तिर्थक्षेत्र विकास १२, शिक्षण २४, महिला व बाल कल्याण १२.५०, उर्जा ३०, पर्यटन १५, साबां ८, गृह विभाग १२.५० व परिवहनसाठी ३ कोटींची तरतूद आहे.

वित्तमंत्र्यांच्या ३ फेब्रुवारीला बैठकीकडे सर्वांचे लक्षराज्याच्या अर्थसंकल्पात आवश्यक तरतूद करण्यासाठी वित्तमंत्री अजित पवार ३ फेब्रुवारीला बैठक घेणार आहे. त्यामध्ये लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा विचार होईल व आराखड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. वित्तमंत्र्यांद्वारा जिल्ह्यासह विभागाचा आढावा अमरावती येथील नियोजन भवनात होण्याची शक्यता आहे.

मार्चपर्यंत निधी खर्च करण्याचे यंत्रणांना आव्हान जिल्ह्यात यापूर्वीच्या टर्ममधील आमदारांनी सूचविलेली कामे व याबाबतचा निधी ३१ मार्चपर्यंत खर्च करण्याचे आव्हान विविध विभागाच्या शासकीय यंत्रणांसमोर आहे. शासनादेशानुसार आता १५ फेब्रुवारीपासून साहित्य खरेदी करता येणार नाही. त्याचाही फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हात राखून निधीचा खर्च पाच मतदारसंघातील नव्या आमदारांच्या निधीमध्ये कपात करण्यात आल्याने त्यांना हात राखूनच खर्च करावा लागेल

३१ जानेवारीला पालकमंत्री पालकमंत्र्यांच्या ३१ जानेवारीच्या आढावा बैठकीत लोकप्रतिनिधी व पदाधिकारी कामांची शिफारस करतील.

४१७ कोटी रुपयांचा प्राथमिक वार्षिक आराखडापालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व वित्तमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत आराखड्यावर चर्चा होणार आहे.

"शासकीय विभागांना दिलेला निधी मार्चअखेरपर्यंत खर्च होईल. जिल्ह्याच्या प्राथमिक वार्षिक आराखड्याला राज्य बैठकीत मान्यता मिळेल. पुढील आर्थिक वर्षासाठी ४१७ कोटींचा हा आराखडा तयार करण्यात आलेला आहे." - अभिजीत मस्के, जिल्हा नियोजन अधिकारी

टॅग्स :MLAआमदारAmravatiअमरावतीMONEYपैसा