अमरावती बाजार समितीत ई-ट्रेडिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 11:27 PM2019-01-21T23:27:19+5:302019-01-21T23:27:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : शेतकऱ्यांना राज्यातीलच नव्हे, तर इतर राज्यातील बाजार समित्यांमध्ये शेतमाल विक्रीचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी ...

E-Trading in Amravati Market Committee | अमरावती बाजार समितीत ई-ट्रेडिंग

अमरावती बाजार समितीत ई-ट्रेडिंग

Next
ठळक मुद्दे२५ हजार शेतकऱ्यांची नोंदणी : दुसºया टप्प्यात वरोरा पाठोपाठ राज्यात बाजी

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शेतकऱ्यांना राज्यातीलच नव्हे, तर इतर राज्यातील बाजार समित्यांमध्ये शेतमाल विक्रीचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी शासनाने राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नाम) उपक्रम सुरू केला. यामध्ये दुसऱ्या टप्प्यात अमरावती बाजार समितीचा समावेश केलेला आहे. सद्यस्थितीत २५ हजार ५८५ शेतकऱ्यांची ई-नाम पोर्टलवर नोंदणी करण्यात आलेली आहे. या उपक्रमात १६ जानेवारीला ई गेट एंट्रीद्वारे एका महिला शेतकऱ्यांची तूर ई-ट्रेडींग करण्यात येवूण ई-नाम प्रणालीद्वारे पेमेंट केलेले आहे.
ई-नाम प्रक्रियेतील कामांबाबत ‘प्राईम मिनिस्टर अवार्ड फॉर एक्सिलन्स इन पब्लिक अ‍ॅडमिनिट्रेशन- २०१९’ करिता जिल्हाधिकाºयांच्या पोर्टलवरून भरण्यासाठी निवड झाली आहे. यासाठी अर्ज भरण्याची मुदत १५ जानेवारी होती. मात्र, याला शासनाला मुदतवाढ दिल्याने अमरावती बाजार समिती राष्ट्रीय स्तरावर अर्ज दाखल करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली. अमरावती बाजार समितीने ई-नाम कक्ष स्थापित केले आहे. बाजार समितीत होणारी १०० टक्के आवक ई-गेट एंट्रीद्वारे करण्यात येत आहे. सद्यस्थितीत बाजार समितीत ई-नाम पोर्टवर २५ हजार ५८५ शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आलेली आहे. या उपक्रमाचा प्रभावीपणे वापर करण्यासाठी पुढील महिन्यात होणाऱ्यां अडते, खरेदीदारांच्या परवाना नूतनीकरणात ई-नाम योजनेच्या अंमलबजावणीसाठी अटी, शर्तीमध्ये प्रचंड बदल करण्यात आलेला आहे. या कार्यप्रणालीमुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात शेतमाल विक्रीची रक्कम त्वरित जमा होणार आहे.
ई-नाम व प्रचलित बाजारातील फरक
ई-नाम ही समांतर विपणन संरचना आहे, तर भौतिक बाजारपेठांच्या राष्ट्रीय नेटवर्कला आॅनलाइन पाहण्याचे एक डिव्हाईस आहे. ई-नाम हे पॅन इंडिया इलेक्ट्रॉनिक्स व्यापार पोर्टल आहे. जे शेतमालाची एकसूत्री भाजारपेठेसाठी बाजार समित्यांचे नेटवर्क तयार करते व सर्व बाजार समित्यांसाठी सेवा पुरविते. यामध्ये इतर सेवांसोबत जिन्नसांची उपलब्धता आणि किती खरेदी व विक्री व्यवहार प्रस्ताव व प्रस्तावाची तरतूद याचा समावेश आहे. या माहितीमधील असमानता कमी होते.
बाजार समितीचा कॅम्पस वायफाय
केंद्र शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट असलेल्या ई-नामसाठी अमरावती बाजार समितीची दुसऱ्या टप्प्यात निवड झालेली आहे. यामध्ये एकूण ३० बाजार समित्यांचा समावेश आहे. यासर्व बाजार समित्यांच्या तुलनेत अमरावती बाजार समितीचे काम अव्वल असल्याने राज्यात दुसºया क्रमांकावर आहे. याकरिता बाजार समितीचा २३ एकरांच्या परिसरात वायफायची सुविधा आहे. अडते, खरेदीदार, शेतकरी यांनी ई-नाम पोर्टलवर नोंदणी केल्यास त्यांना प्रतिदिन एक जीबी डाटा मोफत मिळणार आहे. यासाठी ‘ई-नाम अ‍ॅप’ डाऊनलोड करावे लागणार आहे.
असा झाला ई-नाममध्ये व्यवहार
ई-नाम योजनेंतर्गत आमरावती बाजार समितीत १६ जानेवारीला लोणी येथील महिला शेतकरी प्रणिता प्रकाश देशमुख यांनी ई-नाम एंट्री करून ६.५० क्विंटल तूर विक्रीकरीता अडते वरेश ट्रेडर्स यांच्याकडे विक्रीसाठी आणली. खरेदीदार गिरीश अग्रवाल यांनी ई-ट्रेडींगद्वारे सर्वाधिक बोली नोंदविली. ई- वेट झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात १६ हजार ६९६ रूपये ई-नाम प्रणालीद्वारे जमा करण्यात आले.

Web Title: E-Trading in Amravati Market Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.