शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
4
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
5
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
6
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
7
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
8
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
9
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
10
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
11
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
12
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
13
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
14
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
15
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
17
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...
18
राहुल गांधींचे आव्हान भाजपने स्वीकारले; खुल्या चर्चेसाठी 'या' नेत्याची केली निवड...
19
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
20
RR ला मोठा धक्का; स्टार खेळाडूची IPL 2024 मधून माघार, Play Off ची जागा पक्की होण्यापूर्वी झटका

ई-वन वाघिणीची दहशत; म्हैस ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2019 1:27 AM

वाघिणीने हल्ला करतात पशुपालकाने म्हशीच्या कळपात आश्रय घेतला. सर्व म्हशींनी एकत्र होऊन वाघिणीला दूरपर्यंत पिटाळले. परंतु वाघिणीने म्हशीच्या वगारूवर (बछडा) हल्ला करताच म्हशीने प्रतिहल्ला केला. या झुंजीत म्हैस ठार झाली, तर बछडे गंभीर जखमी झाले.

ठळक मुद्देकळपाने परतविला हल्ला : जामोद येथील थरारक प्रसंग

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : वाघिणीने हल्ला करतात पशुपालकाने म्हशीच्या कळपात आश्रय घेतला. सर्व म्हशींनी एकत्र होऊन वाघिणीला दूरपर्यंत पिटाळले. परंतु वाघिणीने म्हशीच्या वगारूवर (बछडा) हल्ला करताच म्हशीने प्रतिहल्ला केला. या झुंजीत म्हैस ठार झाली, तर बछडे गंभीर जखमी झाले. शनिवारी दुपारी एक वाजता व्याघ्र प्रकल्पाच्या अरण्यात कवडा झिरीनजीकच्या जामोद येथील हा प्रसंग अंगावर शहारे आणणारा ठरला.ब्रह्मपुरीहून येथील जंगलात सोडलेल्या ई-वन वाघिणीची दहशत आणि सतत होत असलेले हल्ले पाहता आदिवासींमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. यातून संघर्षाची ठिणगी पडण्याची भीती व्यक्त होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथून दोन वर्षीय ई-वन वाघिणीला मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल वन्यजीव विभागांतर्गत डोलार जंगलात १५ दिवसांपूर्वी सोडण्यात आले. त्या वाघिणीने व्याघ्र प्रकल्पाच्यावतीने सोडण्यात आलेल्या गोºह्याची शिकार केली. आठवड्यात तिने येथील एका आठ वर्षांच्या बालिकेवर हल्ला केला. तिच्या वडिलांसह गावकऱ्यांनी पिटाळून लावल्याने मोठा अनर्थ टळला. त्याच जंगलात तिने रानडुकराची शिकार केली. त्यानंतर परिसरात पोलिसांसह व्याघ्र प्रकल्पाचे अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून १२ घरांना तार कुंपन लावण्याचे आदेश देत व्याघ्र कर्मचारी तैनात ठेवण्यात आले होते.संघर्ष होण्याची शक्यताडोलार येथील जंगलात ई-वन वाघिणीला सोडल्यानंतर परिसरातील सर्व गावे दहशतीत आली आहे. शनिवारी मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल, प्रकाश घाडगे, बाबूलाल मावस्कर, कालू मालवीय, उपसरपंच आदींची कावळाझिरी येथे बैठक झाली. व्याघ्र प्रकल्पाला विनंती करून सदर वाघिणीला जेरबंद करण्याचे ठरविण्यात आले. तसे पत्रसुद्धा पूर्वीच दिले आहे. यात व्याघ्र प्रकल्पाने योग्य निर्णय न घेतल्यास आदिवासी व्याघ्रप्रकल्प, असा संघर्ष उडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.बछड्यासह मालकाला जीवदानगणपत उदय काळे (३५, रा. कवडाझिरी) यांचा पशुपालनासह दुधाचा व्यवसाय असल्याने नेहमीप्रमाणे ते नजीकच्या जामूनझिरा येथे गुरांना चराईसाठी घेऊन गेले. शनिवारी दुपारी अचानक ई-वन वाघिणीने त्यांच्यावर हल्ला चढविला. त्यांनी आपल्या म्हशीच्या कळपात आश्रय घेतला. दुसरीकडे आपल्या मालकावर हल्ला होत असल्याचे पाहून सर्व म्हशींनी एकत्र येऊन वाघाला पिटाळून लावले. मात्र, काही वेळात परत म्हशीच्या बछड्यावर त्या वाघाने झडप घेतल्याने म्हशीने वाघावर प्रतिहल्ला केला. या झुंजीत म्हैस ठार झाली.

टॅग्स :Tigerवाघ