कर्तव्य गावात अन् वास्तव्य शहरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:12 IST2021-04-20T04:12:55+5:302021-04-20T04:12:55+5:30
करजगाव : शासकीय नोकरदारांना शहरात राहणे आवडते. काही शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना मुख्यालयी राहणे अनिवार्य असतानाही ते मुख्यालयी ...

कर्तव्य गावात अन् वास्तव्य शहरात
करजगाव : शासकीय नोकरदारांना शहरात राहणे आवडते. काही शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना मुख्यालयी राहणे अनिवार्य असतानाही ते मुख्यालयी राहत नसल्याचे माहिती सर्वश्रुत आहे.
कोरोनाची धास्ती, त्यातच तलाठी, ग्रामपंचायत, आरोग्य केंद्र, महावितरणचे कर्मचारी, अधिकारी हे शहरात वास्तव्यास असून, तेथून ये-जा करीत आहेत. त्यामुळे ते कार्यालयात कार्यालयीन वेळेत हजर राहत नसून, नागरिकांना वारंवार चकरा माराव्या लागतात. अशा कामचुकार, वेळकाढू कर्मचारी, अधिकाऱ्यांवर प्रशासकीय अधिकारी, नेते यांचा वचक राहिलेला नाही. यावर कोण अंकुश लावेल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नागरिकांना मनस्ताप
सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे संगनमताने सर्व काही आलबेल सुरू आहे. कुणाचाच धाक नाही की, वचक नाही. वर्तमानपत्रात वारंवार बातमी प्रकाशित झाल्या. परंतु, काहीच फरक पडत नाही. कुणाचाच यावर अंकुश नाही. या सर्वांचा सामान्य नागरिकांना मनस्ताप होत आहे.