धूळफेक : पान मसाला, सुगंधी तंबाखूच्या मिश्रणातून गुटखा

By Admin | Updated: May 31, 2015 00:17 IST2015-05-31T00:17:49+5:302015-05-31T00:17:49+5:30

राज्य शासनाने राज्यभरात गुटखाबंदी केल्यानंतर छुप्या मार्गाने गुटखाविक्री सुरु आहे. मात्र, शासनाच्या ...

Dust: Pan masala, Gutkha with a smoky tobacco mixture | धूळफेक : पान मसाला, सुगंधी तंबाखूच्या मिश्रणातून गुटखा

धूळफेक : पान मसाला, सुगंधी तंबाखूच्या मिश्रणातून गुटखा

व्यावसायिकांचा नवा फंडा : प्रशासनाच्या नाकावर टिच्चून गुटखा विक्री
अमरावती : राज्य शासनाने राज्यभरात गुटखाबंदी केल्यानंतर छुप्या मार्गाने गुटखाविक्री सुरु आहे. मात्र, शासनाच्या डोळ्यांसमोरच सर्रास पानमसाला व सुंगधीत तंबाखुची विक्री सुरु असल्यामुळे ‘त्या’ मिश्रणातून नागरिक गुटखा तयार करुन त्याचे सेवन करीत आहेत. गुटखाबंदीनंतर हा व्यावसायिकांचा गुटखाविक्रीचा नवा फंडा आहे. मात्र, याबाबत शासनच उदासिन असल्याचे दिसते. आज जागतिक तंबाखू दिनानिमित्त नागरिकांनी स्वत:च्या आरोग्यासाठी पाऊल उचलण्याची गरज आहे.
महाराष्ट्रात तंबाखू सेवनाचे प्रमाण सर्वाधिक आहे. विविध सर्वेक्षणांच्या आकडेवारीनुसार यात दरवर्षी वाढ होताना आढळून येते. २०१२-२०१३ मध्ये जिल्हास्तरीय सर्वेक्षणात राज्यात ५० टक्क्यांपेक्षा अधिक नागरिकांमध्ये तंबाखू सेवनाचे व्यसन आढळून आले आहे. दरवर्षी जगात तब्बल ६ मिलियन नागरिकांचा तंबाखू सेवनामुळे मृत्यू होत आहे. २०३० पर्यंत हा मृत्यूचा आकडा ८ मिलियनपेक्षा अधिक होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तबांखूसेवन व सिगारेट ओढणाऱ्यांचे फॅड दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. मात्र, शौकीन मंडळी तबांखूशिवाय जगुच शकत नाहीत, अशी स्थिती होते. तबांखूसेवन कर्करोगास कारणीभूत ठरणारे आहे. तबांखू सेवनामुळे मृत्यू ओढवू शकतो, हे माहित असतानाही आबालवृध्दांमध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण वाढते आहे. राज्यात गुटखाबंदी लागू होऊन दोन वर्षे ेउलटली. अन्न व औषधी प्रशासनाने या दोन वर्षात कोट्यवधींचा गुटखा जप्त करुन व्यावसायिकांवर फौजदारी कारवाई केली आहे. मात्र, शौकीन नागरिकांमुळे गुटखा व्यवसायिकांचे फावत आहेत. ही बाब समाजासाठी घातक ठरणारी आहे.

तंबाखू सेवन कर्करोगास आमंत्रण देणारे आहे. तंबाखूसेवनाचा आरोग्यावर मोठा परिणाम होऊन त्यामुळे मृत्यू ओढवू शकतो. त्यामुळे नागरिकांनी मनावर ताबा ठेवून तंबाखू सेवन बंद केले पाहिजे. हाच यावरील सर्वोत्तम उपाय ठरू शकतो.
-सी.एल. सोनकुसरे,
जिल्हा कार्यक्रम अधिकारी,

Web Title: Dust: Pan masala, Gutkha with a smoky tobacco mixture