कोरोनाकाळात जिल्ह्यात ५९ मुली ‘सैराट’ ५३ घरी परतल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:12 IST2021-03-07T04:12:49+5:302021-03-07T04:12:49+5:30
अमरावती/ संदीप मानकर १८ वर्षांखालील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणे, आई-वडिलांशी भांडण झाले म्हणून घरातून निघून जाणे तसेच ...

कोरोनाकाळात जिल्ह्यात ५९ मुली ‘सैराट’ ५३ घरी परतल्या
अमरावती/ संदीप मानकर
१८ वर्षांखालील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणे, आई-वडिलांशी भांडण झाले म्हणून घरातून निघून जाणे तसेच प्रियकरासोबत पळून जाणे अशा एकूण कोरोनाकाळात २०२० या वर्षात एकूण ५९ मुली ‘सैराट’ झाल्या होत्या. ही धक्कादायक महिती महिला सेलच्या आकडेवारीतून पुढे आली आहे.
याप्रकरणी पोलिसांच्या व महिला सेलच्या मदतीने ५९ पैकी ५३ मुली घरी परतल्या. मात्र, सहा मुली अद्यापही घरी परतल्या नसून त्या बेपत्ता आहेत. त्यांचा शोध पोलीस घेत आहे. अल्पवयीन मुलीला अज्ञात आरोपीने पळून नेल्याच्या सर्वाधिक तक्रारी पोलीस आयुक्तालय हद्दीतील १० ठाण्यांत दाखल आहेत. मात्र, लॉकडाऊनच्या व कोरोना काळातही अल्पवयीन मुलींचे घरातून पळून जाण्याचे, निघून जाण्याचे किंवा फूस लावून पळवून नेल्याचे प्रमाण अधिक आहे. काही प्रकरणांत मुली चक्क आपल्या बॉयफ्रेन्डसोबत पळून गेल्याचे समोर आले. मात्र, पोलिसांनी आपली कस्ब पणाला लावून त्यांना परत आणून पालकांच्या स्वाधीन केले. यात महिला सेलचीसुद्धा कामगिरी महत्त्वाची आहे.
बॉक्स
सहा मुलींचा शोध लागेना
जिल्ह्यात २०२० या वर्षात ५९ मुली सैराट झाल्या होत्या. त्या सर्व मुुली १८ वर्षांखालील आहेत. मात्र, त्यातील ५३ मुुली घरी परतल्या असून, अद्यापही सहा मुलींचा शोध लागलेला नाही. मुुलींच्या पालकांनी पोलिसांत यासंदर्भात तक्रार नोंदविली आहे. मुलींचा शोध पोलीस घेत आहे.
बॉक्स
दोन महिन्यांत १५ मुुली बेपत्ता
नवीन वर्षातही १५ मुली शहर हद्दीतून बेपत्ता झाल्या. यात जानेवारी महिन्यात ९, तर फेब्रुवारी महिन्यात ६ अशा १५ मुली यंदा सैराट झाल्या आहेत. त्यांचा शोधसुद्धा पोलीस घेत आहेत. २०२० मध्ये २२ अल्पवयीन मुलेसुद्धा घरून निघून गेले होते. त्यापैकी २१ मुले परतल्याची नोंद पोलिसांकडे आहे.
कोणत्या महिन्यात किती सैराट?
जानेवारी- ११
फेब्रुवारी -५
मार्च -४
एप्रिल - १
मे -२
जून -६
जुलै-६
ऑगस्ट-४
सप्टेंबर -३
ऑक्टोंबर -६
नोव्हेंबर -५
डिसेंबर -९
कोणत्या वर्षात किती ?
२०१८-७२
२०१९-१०५
२०२०-५९
कोट
पोलीस आयुक्तांचा कोट आहे.