चुकीच्या नियोजनामुळे प्रवासी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2016 00:13 IST2016-02-05T00:12:37+5:302016-02-05T00:13:38+5:30
दर्यापूर ते अकोट मार्गावरील बसफेऱ्या कमी झाल्यामुळे प्रवाशांना व विद्यार्थ्यांना बसेससाठी ताटकळावे लागत आहे.

चुकीच्या नियोजनामुळे प्रवासी त्रस्त
समस्या : दर्यापूर-आकोट मार्गावर बसफेऱ्या कमी
दर्यापूर : दर्यापूर ते अकोट मार्गावरील बसफेऱ्या कमी झाल्यामुळे प्रवाशांना व विद्यार्थ्यांना बसेससाठी ताटकळावे लागत आहे. विशेष म्हणजे दर्यापूर ते अकोटकरिता कित्येक बसफेऱ्या दर १५ मिनिटांनी सुटतात. परंतु मध्ये एक-दोन तास बसेस उपलब्ध नसतात. दर १५ मिनिटांनी सुटणाऱ्या बसेस अनेकदा रिकाम्याच निघून जातात.
राज्य परिवहन महामंडळाचे नुकसान होते. अनेकदा बसेस नसल्यामुळे प्रवाशांना वाट पाहात थांबावे लागते. विद्यार्थ्यांनासुद्धा शाळेकरिता वेळेवर हजर न राहिल्याने शिक्षणापासून वंचित रहावे लागते. अन्यथा खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. ३ फेब्रुवारीला दर्यापूर-अकोट बसफेरीसाठी सर्व प्रवासी ताटकळत होते. (शहर प्रतिनिधी)