शहरं
Join us  
Trending Stories
1
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
2
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; समोर आला थरकाप उडवणारा VIDEO
3
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
4
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
5
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
6
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
7
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
8
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
9
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
10
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
11
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
12
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
13
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
14
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
15
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
16
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
17
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
18
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
19
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
20
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका

उन्हामुळे जनावरांच्या आजाराचे प्रमाण वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2024 14:09 IST

पशुधनाची काळजी घ्या; 'पशुसंवर्धन'चे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क धामणगाव रेल्वे: सध्या उन्हाचा कडाका वाढल्याने पशुधनावर देखील विपरीत परिणाम होऊ लागला आहे. सध्या जनावरांमध्ये वाढते आजाराचे प्रमाण लक्षात घेता पशुपालकांनी आपल्या पशुधनाची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

जिल्ह्यात पशुपालकही मोठ्या प्रमाणात आहेत. एप्रिल महिन्यात तापमान ४२ अंशांवर गेले आहे. या तापत्या उन्हाचा परिणाम जसा मनुष्यावर पडत आहे. तसाच परिणाम जनावरांवरसुद्धा पडत असतो. त्यामुळे पशुपालकांना जनावरांची काळजी घेणे गरजेचे आहे. जनावरांना मुबलक प्रमाणात थंड पिण्याचे पाणी उपलब्ध करावे, आदी सूचना करण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यात मागील दोन आठवड्यांपासून पारा वाढला आहे. दररोज ४२ अंशांपेक्षा अधिक तापमान राहत आहे. उन्हापासून नागरिक जसे उपाययोजना करीत आहेत. तशाच पद्धतीने जनावरांचीही काळजी घ्यावी, असे आवाहन केले जात आहे.

अशी घ्यावी पशुधनाची काळजी उन्हाळ्यात जनावरांना शक्यतो सकाळी व संध्याकाळी ऊन कमी असताना चारण्यास सोडावे, हवामान पूरक सुधारित गोठे बांधावेत, गोठ्यांची उंची जास्त असावी, गोठ्यात हवा खेळती ठेवावी, छपराला शक्यतो पांढरा चुना अथवा रंग लावावा. त्यावर पालापाचोळा पाचट टाकावे, परिसर थंड राहण्यासाठी झाडे लावावीत.

दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे ढगाळ वातावरण व पाऊस येत असला तरी उन्हात जनावरांची काळजी घेणे गरजेचे आहे सकाळी व सायंकाळी जनावरे चारण्यासाठी न्यावे तसेच वेळेवर पाणी पाजावे. वेळप्रसंगी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा- आर. जी. राऊत, पशुधन अधिकारी, धामणगाव रेल्वे 

टॅग्स :Summer Specialसमर स्पेशलAnimal Abuseप्राण्यांवरील अत्याचारFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र