पावसामुळे राज्य महामार्गाची दुर्दशा

By Admin | Updated: June 30, 2015 00:25 IST2015-06-30T00:25:48+5:302015-06-30T00:25:48+5:30

जिल्हाधिकारी अध्यक्ष असणाऱ्या रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीच होत नसल्याने जिल्ह्यातील राज्य महामार्गाची दूरवस्था झाली आहे.

Due to rain, the state highway's plight | पावसामुळे राज्य महामार्गाची दुर्दशा

पावसामुळे राज्य महामार्गाची दुर्दशा

निष्पाप जातात बळी : रस्ता सुरक्षा समितीचे दुर्लक्ष
अमरावती : जिल्हाधिकारी अध्यक्ष असणाऱ्या रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीच होत नसल्याने जिल्ह्यातील राज्य महामार्गाची दूरवस्था झाली आहे. त्यामुळे अनेक निष्पाप हकनाक बळी जात आहेत.
जिल्ह्यात अमरावती-मोर्शी, वरूड, चांदूरबाजार, नांदगाव खंडेश्वर, कुऱ्हा, चांदूररेल्वलो जोडणारा राज्य महामार्ग अनेक ठिकाणी उखडला आहे. काही ठिकाणी दुरुस्तीच्या नावाखाली खड्डे खोदले आहे. खोदून ठेवलेले रस्ते नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहेत. दररोज लहानमोठे अपघात या ठिकाणी होत आहेत. या मार्गावर शेकडो जड वाहनांद्वारा रेतीची ओव्हरलोड वाहतूक केली जाते. या जड वाहतुकीमुळे हे रस्ते ठिकठिकाणी उखडले आहेत. रस्ता दुरूस्तीच्या नावाखाली रस्त्यावर अस्तव्यस्त साहित्य पडले आहेत. हे अपघाताला निमंत्रण देणारे आहे, रस्त्याची दुरूस्ती सुरू आहे, हे सांगणारे फलकदेखील दिसत नाही. अनेकदा वाहन चालकाला दिसत नाही. वळण रस्ता दर्शविणारे फलकदेखील कित्येक ठिकाणी नाहीत. मुळात रस्ता सुरक्षा समिती व बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असल्यानेच राज्य महामार्गाची दुर्दशा झाली आहे. (प्रतिनिधी)


रस्ता सुरक्षा समितीच गायब
मोटर वाहन कायदा १९८८ च्या कलम २१५ नुसार केंद्र, राज्य व जिल्हास्तर रस्ता सुरक्षा स्थापनेची तरतूद आहे.
रस्ते अपघात व उपाययोजना तसेच यासंदर्भाने उपस्थित होणाऱ्या समस्यांचा सर्वंकष अभ्यास होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती कार्य करते.
रस्ता सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून समितीद्वारा उपाययोजना सुचविल्या जातात.
रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकी जिल्ह्यात कित्येक महिन्यांत झाल्याच नाहीत.

Web Title: Due to rain, the state highway's plight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.