प्रवासी वाहनाची उभ्या टिप्परला धडक
By Admin | Updated: December 7, 2014 22:42 IST2014-12-07T22:42:08+5:302014-12-07T22:42:08+5:30
भरधाव काळी-पिवळी टॅक्सी वाहनाने रस्त्याच्या कडेला उभ्या टिप्परला जोरदार धडक दिली. यात युवतीसह महिला ठार झाली असून सहा प्रवासी गंभीर जखमी झाल्या. ही घटना नांदगाव पेठ मार्गावरील

प्रवासी वाहनाची उभ्या टिप्परला धडक
अमरावती : भरधाव काळी-पिवळी टॅक्सी वाहनाने रस्त्याच्या कडेला उभ्या टिप्परला जोरदार धडक दिली. यात युवतीसह महिला ठार झाली असून सहा प्रवासी गंभीर जखमी झाल्या. ही घटना नांदगाव पेठ मार्गावरील टोल नाक्याजवळ रविवारी सकाळी १०.३० वाजता घडली.
गाडगेनगर परिसरातील पावडे प्लॉट येथील रहिवासी नीता रमेश ठाकरे (३५) व मोर्शी तालुक्यात निंभी येथील समीक्षा वासुदेवराव साबळे (१९), अशी मृतांची नावे आहेत. तर जखमींमध्ये मयुरी बाविस्कर, वैष्णवी भालेराव, केतकी भालेराव, गणेश ठाकरे, सागर ठाकरे व प्रमोद भेले हे गंभीर जखमी झाले. या वाहनात सुमारे १५ प्रवासी होते. यातील उर्वरित प्रवासीही किरकोळ जखमी झाले आहेत. यातील मृत समीक्षा ही अभियांत्रिकीची विद्यार्थिनी होती.