शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

भूखंड प्रमाणपत्र न मिळाल्याने लाभार्थी लाभापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 22:15 IST

तालुक्यातील येरड येथील एका दिव्यांग प्रकल्पग्रस्ताला अमरावतीचे जिल्हा पुनर्वसन अधिकारी अजय लहाने यांनी भूखंड प्रमाणपत्र न दिल्यामुळे ते लाभार्थी विशेष घटक योजनेपासून वंचित राहिल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांच्या अशा प्रतापामुळे लाभार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष खदखदत आहे. 

ठळक मुद्देजिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांचा प्रताप : लाभार्थी शंकर उईके यांची कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर रेल्वे : तालुक्यातील येरड येथील एका दिव्यांग प्रकल्पग्रस्ताला अमरावतीचे जिल्हा पुनर्वसन अधिकारी अजय लहाने यांनी भूखंड प्रमाणपत्र न दिल्यामुळे ते लाभार्थी विशेष घटक योजनेपासून वंचित राहिल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. जिल्हा पुनर्वसन अधिकाºयांच्या अशा प्रतापामुळे लाभार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष खदखदत आहे. सन २०१८-२०१९ आर्थिक वर्षात विशेष घटक योजनेंतर्गत ७५ टक्के अनुदानावर अनुसूचित जाती-जमाती व नवबौद्ध लाभार्थ्यांकरिता ३० जुलैपर्यंत अर्ज मागविण्यात आले. या योजनेमधून शासनाच्या सहाय्याने स्वयंरोजगार उभा करण्यासाठी शेळीच्या लाभाकरिता चांदूर रेल्वे तालुक्यातील येरड (बाजार) येथील शंकर जगदेव उईके यांनी भूखंड प्रमाणपत्र वगळता इतर सर्व कागदपत्रे जमा केली. त्यानंतर ते भूखंड प्रमाणपत्राकरिता २४ जुलैला दिव्यांग प्रकल्पग्रस्त संजय विठ्ठलराव डगवार यांच्यासमवेत जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा पुनर्वसन अधिकारी (उपजिल्हाधिकारी, पुनर्वसन) यांच्या कार्यालयात गेले होते. मात्र, भूखंडाचे पैसे भरल्याशिवाय भूखंड प्रमाणपत्र मिळणार नसल्याचे फर्मान जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांनी सोडले. परंतु, यापूर्वी आपल्या कार्यालयाकडून सर्व प्रकल्पग्रस्तांना पैसे न भरता भूखंड प्रमाणपत्र दिल्याचे अजय लहाने यांच्या लक्षात आणून दिले. यापूर्वी भूखंडाची रक्कम भरण्यास प्रकल्पग्रस्तांना कोणतीही पूर्वसूचना दिली नाही. ग्रामपंचायत कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर पुनर्वसन विभागाने अशी नोटीससुद्धा लावली नाही.भूखंड प्रमाणपत्र अतिआवश्यक असल्याने ते देण्याची वारंवार विनंती केल्याचे शंकर उईके यांनी सांगितले. मात्र, त्यांनी दमदाटी करीत भूखंड जप्तीची धमकी दिल्याचा आरोप उईके यांनी केला आहे. जिल्हा पुनर्वसन अधिकाºयाने भूखंड प्रमाणपत्र न दिल्यामुळे मला योजनेचा अर्ज सादर करता आला नाही व मी विशेष घटक योजनेपासून वंचित राहिल्याचे शंकर उईके यांनी म्हटले. विविध शासकीय योजनेपासून लाभार्थी वंचित राहता कामा नये, असे सरकारचे आदेश असताना प्रशासनाची जबाबदार अधिकारी अशाप्रकारे कागदपत्रांची अडवणूक करीत असल्याने सदर लाभार्थी वंचित राहिले. जिल्हा पुनर्वसन अधिकाºयांच्या या प्रतापामुळे आधीच हलाखीत जीवन जगत असलेल्या शंकर उईके यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शंकर उईके यांना न्याय मिळेल का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.अजय लहानेेंंवर कारवाईची मागणीजिल्हा पुनर्वसन अधिकारी अजय लहाने यांच्यावर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. मी लाभापासून वंचित राहिलो असून, यापुढे अशी वेळ कुणावरही येऊ शकते. त्यामुळे वरिष्ठांनी अशा बेजबाबदार अधिकाºयांवर कठोर कारवाई करून धडा शिकवावा, अशी मागणी शंकर उईके यांनी केली. प्रकल्पग्रस्तांसोबत दबंगगिरीजिल्हा पुनर्वसन अधिकारी अजय लहाने यांच्याकडून अशाप्रकारे बोलण्याची अपेक्षाही केली नव्हती. या अधिकाऱ्याला प्रकल्पग्रस्तांसोबत कसे बोलावे, हे जर समजत नसेल तर त्यांना त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही. आमच्यासोबत दबंगगिरी करीत भूखंड जप्त करण्याची धमकी दिल्याने आमच्यावर हे अन्याय नव्हे काय, असा सवाल दिव्यांग प्रकल्पग्रस्त संजय डगवार यांनी केला आहे.