नियमबाह्य मुदतवाढीतील ‘डीई’मुळे मानसिक तणाव !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 23:47 IST2017-12-14T23:47:37+5:302017-12-14T23:47:53+5:30

महापालिकेचे पशुशल्यचिकित्सक सुधीर गावंडे यांच्या आत्महत्येस ७२ तास उलटत असताना याप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहेत. मोकाट श्वान पकडणाºया संस्थेस नियमबाह्यरीत्या मुदतवाढ देण्याच्या प्रकरणात महापालिका प्रशासनाने गावंडे यांची खातेचौकशी आरंभली होती, .....

Due to non-deadline extension, mental stress! | नियमबाह्य मुदतवाढीतील ‘डीई’मुळे मानसिक तणाव !

नियमबाह्य मुदतवाढीतील ‘डीई’मुळे मानसिक तणाव !

ठळक मुद्देसुधीर गावंडे आत्महत्या प्रकरण : राजापेठ पोलिसांकडून कसून चौकशी

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महापालिकेचे पशुशल्यचिकित्सक सुधीर गावंडे यांच्या आत्महत्येस ७२ तास उलटत असताना याप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहेत. मोकाट श्वान पकडणाºया संस्थेस नियमबाह्यरीत्या मुदतवाढ देण्याच्या प्रकरणात महापालिका प्रशासनाने गावंडे यांची खातेचौकशी आरंभली होती, हे नवे वास्तव उघड झाले आहे. ८ डिसेंबर रोजी याबाबतचे आदेश आयुक्त हेमंत पवार यांनी जारी केले. ते आदेश ९ वा १० डिसेंबरला गावंडे यांना मिळाल्याचे गृहित धरल्यास त्या आदेशामुळे ते अत्याधिक मानसिक तणावात गेल्याची शक्यता नाकारता येत नाही. या अनुषंगानेही राजापेठ पोलिसांनी सखोल चौकशी केल्यास वास्तव उघड होऊ शकते, अशी प्रतिक्रिया उमटली आहे. मागील चार महिन्यांत गावंडे यांच्यावर कुठलीही प्रशासकीय कारवाई करण्यात आली नव्हती, असा दावा प्रशासनाकडून करण्यात आल्याने ‘खातेचौकशी’ कारवाईच्या कुठल्या सदरात मोडते, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मोकाट श्वान पकडण्यासाठी ज्या संस्थेशी करारनामा करण्यात आला. त्या संस्थेला वारंवार नियमबाह्य मुदतवाढ देण्यात आल्याचा प्रकार लेखापरीक्षणात उघड झाल्यानंतर अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे यांच्यावरील खातेचौकशीबाबतचा प्रस्ताव नगरविकास खात्याकडे पाठविण्यात आला. महापालिका आस्थापनेवर असलेल्या सात अधिकारी कर्मचाऱ्यांविरुद्ध दोषारोपपत्र बजावण्यात येऊन शिस्तभंग कारवाई करण्यासाठी खात ेचौकशीचे आदेश पारित झाले. यात सुधीर गावंडे यांच्यासह पशुवैद्यकीय विभागात कार्यरत विद्यमान अधिकारी व कर्मचाºयांसह ७ जणांचा समावेश आहे. तर एका कर्मचाºयाची बदली झाली आहे. चौकशी अधिकारी म्हणून आर.के.हुशारे तर सादरकर्ता अधिकारी म्हणून शामकांत टोपरे काम करणार आहेत.
महापालिकेत लपवाछपवीचे सत्र
सुधीर गावंडे यांच्यासंबंधी सर्व प्रशासकीय दस्तऐवज सामान्य प्रशासन विभाग व पशुशल्यचिकित्सक कार्यालयात उपलब्ध आहेत. गावंडे आत्महत्या प्रकरणाने एकीकडे कर्मचारी दहशतीत असताना त्याचे बालंट आपल्यावर येऊ नये, यासाठी एक आघाडी सरसावली आहे. त्यामुळे यासंबंधीच्या दस्तऐवजात बदल संभवतो. प्रशासनाला कसे वाचवता येईल, या पद्धतीने काही आदेश आणि फाईल्समध्ये छेडछाड करण्यात येत असल्याची माहिती नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर महापालिकेच्या एका कर्मचाºयाने दिली.
पोलीस भलतेच प्रामाणिक ?
राजापेठ पोलिसांनी सुधीर गावंडे यांच्या आत्महत्येप्रकरणी जया गावंडे व साहेबराव गावंडे यांच्या तक्रारीनुसार महापालिकेला मुद्देनिहाय माहिती मागितली. त्यात मुदतही घालून दिली नाही. एखाद्या दस्तऐवजात मनाजोेगा बदल वा सुधारणा करण्याची संधी पोलिसांनी संबंधिताना दिली की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी महापालिका गाठून संबंधित दस्तावेजांची शहानिशा करुन ते जप्त करणे अभिप्रेत असताना महापालिकेला माहिती सादर करण्यासाठी पुरेसा अवधी देण्यात आला. त्यापार्श्वभूमिवर काही कागदपत्रांमध्ये बदल करण्याचा व प्रयत्न करण्यात आल्याची माहिती आहे.

Web Title: Due to non-deadline extension, mental stress!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.