डासांमुळे सारेच त्रस्त

By Admin | Updated: August 11, 2014 23:38 IST2014-08-11T23:38:07+5:302014-08-11T23:38:07+5:30

पावसाळ्यात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने जणू डास व अमरावतीकरांमध्ये द्वदंयुध्द सुरु झाल्याचे चित्र दिसत आहे. शहरातील प्रत्येक परिसरात डासांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिक हैराण झाले आहे.

Due to mosquitoes, all the suffering | डासांमुळे सारेच त्रस्त

डासांमुळे सारेच त्रस्त

आरोग्य धोक्यात : डेंग्यू, मलेरिया, चिकन गुनिया, हत्ती रोगांचा प्रसार
वैभव बाबरेकर - अमरावती
पावसाळ्यात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने जणू डास व अमरावतीकरांमध्ये द्वदंयुध्द सुरु झाल्याचे चित्र दिसत आहे. शहरातील प्रत्येक परिसरात डासांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिक हैराण झाले आहे. डांसामुळे आजार वाढले असून रुग्णालये रुग्णांना तुडूंब भरले आहे. यावर महापालिकेकडून डास निर्मूलन मोहीम राबविली जात आहे. मात्र तरीही डासांची उत्पत्ती रोखण्यात प्रशासनासह नागरिक हैराण झाले आहे.
पावसाळ्यात ठिकठिकाणी साचलेले पाण्याचे डबके तसेच घराघरामध्ये पाण्याचा साठाकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. डासांची प्रजाती विविध प्रकारची असतानाही प्रत्येक डासांमुळे काही ना काही आजार होण्याची शक्यता आहे.गेल्या काही वर्षामध्ये डासामुळे होणाऱ्या आजारांमध्ये मोठी वाढ दिसून आली असून डासापासून बचाव करण्याकरिता विविध प्रयत्न नागरिक करीत आहे. मात्र डासांचे प्रमाण कमी होण्याचे चिन्ह दिसून येत नाही. श्रीमंत नागरिकांच्या घरी डास निर्मूलनासाठी उपाययोजना करण्याचे साहित्याचा वापर होत असल्यामुळे डासांपासून बचाव करणे सोपे जात आहे. मात्र यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना डासांपासून मरण यातना सोसाव्या लागत आहे. दररोज सकाळी व सायंकाळी डांसाचा थैमान पाहायला मिळते. सद्यस्थितीत डासांसोबत नागरिकांचे द्वदंयुध्द होत असल्याचे दिसून येते. यामध्ये हजारो डास मारण्यात येते तरीसुध्दा डास अधिक असल्यामुळे पुन्हा डासांचा हल्ला चढविणे सुरुच असते. त्यामुळे नागरिक अक्षरश: डासांमुळे हैराण झाल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Due to mosquitoes, all the suffering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.