शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

अपु-या पावसामुळे उपशावर निर्बंध, स्त्रोतांच्या ५०० मीटर अंतरात विहीर खोदण्यास मनाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2017 14:39 IST

यंदा सरासरीपेक्षा कमी झाल्यामुळे आगामी काळात पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठीचे नियोजन आखले जात आहे.

अमरावती : यंदा सरासरीपेक्षा कमी झाल्यामुळे आगामी काळात पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठीचे नियोजन आखले जात आहे. यासाठीच्या उपाययोजना राबविण्यासाठी कृती आराखडा तयार करावा, असे निर्देश शुक्रवारी पाणीपुरवठा विभागाने संबंधित यंत्रणेला दिले आहेत. आतापासूनच तत्परतेने कार्यवाही सुरू करावी, यासाठीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.पाणीटंचाई निर्माण झालेली गावे, वाड्यांमध्ये तसेच नागरी क्षेत्राच्या आवश्यकतेनुसार स्थानिक परिस्थिती व स्त्रोतांचा विचार करून प्रस्तावित व किमान खर्चाच्या उपाययोजनांविषयी कार्यवाही करण्याचे निर्देशित केले आहे. मुळात पाणीटंचाई निर्माण होऊच नये, यासाठी ग्रामस्तरावर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहे.पाण्याच्या स्त्रोताचे बळकटीकरण व शिवकालीन पाणी साठवण योजनांसह जलसंधारणाच्या विविध उपाययोजना राबविण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. संभाव्य टंचाईग्रस्त पाणलोट क्षेत्रनिहाय व गावनिहाय आराखड्यांची कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात येऊन पाण्याची पातळी दोन मीटरपेक्षा अधिक खाली गेलेल्या गावांची यादी तयार करण्याचे सूचित करण्यात आलेले आहे. या गावांमध्ये विविध योजनांचे स्त्रोत युद्धपातळीवर पूर्ण करून गावांना त्वरित लाभ देण्याविषयीचे निर्देश देण्यात आले आहे.अनेक गावातील योजना ह्या प्रकल्पावर अवलंबून आहेत. तेथील साठा पिण्याच्या पाण्याकरिता राखीव ठेवून वापराचे नियोजन करण्यात येणार आहे. पाण्याचा अनिर्बंध उपसा व अपव्यय होणार नाही याची स्थानिक स्वराज्य संस्थांनी खबरदारी घ्यावी, असे निर्देश पाणीपुरवठा विभागाने दिले आहे. पाणी पुरवठ्यासाठी शक्यतोवर शासकीय टँकरचाच वापर करावा. खासगी टँकरचा करारनामा करताना टँकरवर जीपीएस यंत्रणा बसविण्याबाबतची व त्या टँकरची देखभाल दुरुस्ती वाहतूकदारानेच करायची, अशी अट घालण्याबाबत सूचित करण्यात आले आहे.एक किमी परिघातील उपश्यावर निर्बंधसार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतापासून ५०० मीटर अंतरात पिण्याच्या पाण्याच्या प्रयोजनाव्यतिरिक्त इतर कारणासाठी विहीर खोदण्यास मनाई, पिण्याच्या पाण्याच्या एक किमी परिघात असणा-या स्त्रोताच्या उपश्यावर निर्बंध, उपश्याचे पाणलोट क्षेत्र असेल त्या क्षेत्रात पिण्याच्या पाण्याच्या प्रयोजनाव्यतिरिक्त विहीर खोदण्यात मनाई व सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या उद्भवावर प्रतिकूल परिणाम करणा-या विहिरींच्या उपशावर आता निर्बंध आणन्यात येणार आहे.

टॅग्स :Waterपाणी