दरवाढीमुळे राज्यातील उद्योग माघारले
By Admin | Updated: March 6, 2015 00:44 IST2015-03-06T00:44:53+5:302015-03-06T00:44:53+5:30
आतापर्यंत सामान्य वीज ग्राहकांवर ३५ टक्के वीज दरवाढीचा फटका बसला आहे. आता नव्याने वीज दरवाढ प्रस्तावित आहे.

दरवाढीमुळे राज्यातील उद्योग माघारले
अमरावती : आतापर्यंत सामान्य वीज ग्राहकांवर ३५ टक्के वीज दरवाढीचा फटका बसला आहे. आता नव्याने वीज दरवाढ प्रस्तावित आहे. औद्योगिक क्षेत्रात वीज हा महत्त्वाचा दुवा असून शेजारील राज्यांत कमी दरात वीज मिळत असल्याने महाराष्ट्रातील उद्योजक त्यांच्याशी स्पर्धा करु शकत नाहीत, असे उद्योजकांचे म्हणणे आहे. वीज दरवाढीने उद्योजक हैराण झाल्यामुळे ते महाराष्ट्रातून अन्य राज्यात उद्योग हलवित आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात रोजगारनिर्मिती थांबली असून राज्य औद्योगिकदृष्ट्या माघारल्याचे शल्य उद्योजकांना आहे. म्हणून महावितरणद्वारे प्रस्तावित वीज दरवाढीला स्थगिती देऊन सामान्य ग्राहक, उद्योजकांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे.
अधीक्षक अभियंता दिलीप घुगल यांना मागण्यांचे निवेदन सादर करताना असोसिएशनचे अध्यक्ष विजय जाधव, नीलेश दम्माणी, अशोक गोयल, एफआयएचेअध्यक्ष किरण पातुरकर, औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष वीरेंद्र लढ्ढा, किशोर नालमवार, द्वारकाप्रसाद भंसाली, विजय मोहता, भरत भायाणी, नितीन मोहोड आदी उपस्थित होते.