शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
4
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
7
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
8
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
9
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
10
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
11
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
12
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
13
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

मेळघाटातील नद्यांचे अस्तित्व धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 1:23 AM

तालुक्यात नदी-नाल्यांतील पाणीसाठा संपल्यानंतरसुद्धा नदीपात्रात खड्डे करून पाणी उपसण्याचा प्रकार पाहावयास मिळत आहे. त्याचा परिणाम भूजलपातळीवर होणार आहे. दरम्यान, जंगलातील कृत्रिम पाणवठेही कोरडे झाले आहेत.

ठळक मुद्देसिंचनासाठी नदीपात्रात खड्डे : जंगलातील कृत्रिम पाणवठेही कोरडे

श्यामकांत पाण्डेय ।लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : तालुक्यात नदी-नाल्यांतील पाणीसाठा संपल्यानंतरसुद्धा नदीपात्रात खड्डे करून पाणी उपसण्याचा प्रकार पाहावयास मिळत आहे. त्याचा परिणाम भूजलपातळीवर होणार आहे. दरम्यान, जंगलातील कृत्रिम पाणवठेही कोरडे झाले आहेत.मेळघाटातील लहान-मोठे नदी-नाले मेळघाटातील सिंचनाचे सर्वात मोठे स्रोत म्हणून ओळखले जातात. तापी, गडगा, खंडू, खापरा या नद्यांसह इतर लहान-मोठे नालेसुद्धा पाण्याचे स्रोत म्हणून काम करीत आहेत. परंतु, तीन-चार वर्षांपासून मेळघाटातसुद्धा पाऊस कमी प्रमाणात पडल्यामुळे मार्च महिन्यापासून नदी-नाले आटत चालले आहेत. नदीपात्रातील उरले सुरले पाणी सिंचनासाठी वापरून घेतल्यानंतर उन्हाळी मुगासारख्या पिकांसाठी आणखी पाण्याची आवश्यकता भासत असल्याने लोकांनी नदीपात्रात अक्षरश: विहीरसदृश्य खड्डे खोदून त्यात लागलेल्या पाण्यात मोटरपंप टाकून सिंचनाची व्यवस्था करण्यात येत आहे. त्यामुळे नदीपात्रांचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे. या प्रकारात प्रशासनाने पुढाकार घेत अंकुश लावलेला नाही, प्रबोधन केले नाही वा कुणी पुढे येऊन तक्रार केल्याचेही अद्याप निदर्शनास आलेले नाही.सिंचनासाठी पर्याय ठरणार तापदायकमेळघाटात शेती वगळता व्यवसाय नसल्याने सर्वांचे लक्ष भरघोस पीक काढून आर्थिक उत्पन्न वाढविण्याकडे असते. त्याकरिता उन्हाळी पीक घेण्याकडे कल वाढलेला आहे. विहीर आणि बोअरवेलचे पाणी दिवसेंदिवस खाली जात असल्यामुळे सिंचनाची अवस्था बिकट झाली आहे. अशा परिस्थितीत जवळपासच्या नदी-नाल्यांतून पाणी उपसण्याचा प्रताप सुरू असल्यामुळे मे आणि जून महिन्यातील ताप सहन करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.निसर्गाने मेळघाटला भरभरून दिले. क्षुल्लक स्वार्थापोटी मानवाने पर्यावरणाचा सत्यानाश केला. अवैध सिंचनाविरुद्ध कारवाई होणे आवश्यक आहे.- रामदास जयस्वाल, पर्यावरणप्रेमी, शिरपूरशेतीसाठी पाण्याची आवश्यकता आहे. मात्र, पर्यावरणाचे नुकसान समर्थनीय ठरू शकत नाही. संबंधित विभागाने उपशाकडे लक्ष द्यावे.- तुलसीराम सोनकर,शेतकरी, धारणी