भूकंपामुळे 'लँगटँग' पर्वताची उंची घसरली
By Admin | Updated: May 14, 2015 23:59 IST2015-05-14T23:59:10+5:302015-05-14T23:59:10+5:30
भूकंपामुळे हिमालयावरील लँगटँग पर्वताची उंची एक मीटरने कमी झाल्याचा प्राथमिक अहवाल युनायटेड स्टेट्सचे भूर्गभशास्त्र संशोधक रेचर्ड ब्रिक्स यांनी केले आहे.

भूकंपामुळे 'लँगटँग' पर्वताची उंची घसरली
वैभव बाबरेकर अमरावती
हिमालयन थ्रस्ट फॉल्टमुळे नेपाळ येथे भूकंपाचे तीव्र हादरे जाणवले. या भूकंपामुळे हिमालयावरील लँगटँग पर्वताची उंची एक मीटरने कमी झाल्याचा प्राथमिक अहवाल युनायटेड स्टेट्सचे भूर्गभशास्त्र संशोधक रेचर्ड ब्रिक्स यांनी केले आहे.
भारताचा भूगाग दरवर्षी ४.५ से.मी.ने पश्चिम-पूर्व बाजूने सरकत आहे. तसेच युरेशियन भूगाग हा भारताच्या भूभागकडे सरकत असल्याची निरीक्षणे संशोधकांनी नोंदविली आहेत. दोन्ही भूगाग एकेमकांना ढकलत असल्यामुळे मधल्या भूभागावर दाब निर्माण झाला आहे. दोन्ही भूगाग एकमेकांकडे सरकण्याची प्रक्रिया निरंतर सुरू असल्यामुळे भूकंपाचे हादरे बसणे ही अपेक्षित आणि नैसर्गिक प्रक्रिया असल्याचे मत भूगर्भशास्त्र संशोधकांचे आहे. या प्रक्रियेला संशोधक 'टेक्टॉनिक अॅक्टिव्हिटी' असे संबोधतात. ४० ते ५५ मिलीयन वर्षांपूर्वीपासून भारताचा भूगाग ५ हजार किलोमीटरने सरकल्यावर युरेशियन भूगागाला जाऊन टेकला. त्यामुळे हिमालय पर्वतरांगांसोबतच तिबेट व नेपाळचाही भूभाग तयार झालेला आहे.
नेपाळमधील काठमांडू दाबपट्ट्यातील प्रदेश असून तेच भूकंपाचे मुख्य केंद आहे. भूकंप केंद्रबिंदूच्या पूर्वेकडे ८ हजार ८४८ मीटर उंचीचा एव्हरेस्ट पर्वत आहे. हिमालयाच्या पर्वतरांगांवर लँगटँग व गणेश हिमल नावाचा भाग आहे. काठमांडू व अन्य ठिकाणी झालेल्या भूकंपानंतर संशोधकाने जीपीएस प्रणालीच्या माध्यमातून हिमालयाची उंची जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये लँगटँग पर्वताचा ८० ते १०० किलोमीटरच्या भूगागाची उंची १ मीटरने कमी झाल्याचे प्राथमिक निष्कर्ष संशोधक रेचर्ड ब्रिक्स यांनी नोंदविला.
गणेश हिमलची उंचीसुध्दा एक ते दीड मीटरने कमी झाल्याचा प्राथमिक अंदाज जर्मन एअर स्पेस सेंन्टरचे संशोधक स्वीस्टीयन मिनेट यांनी वर्तविला आहे. मात्र, एव्हरेस्टच्या उंचीबद्दल अद्यापपर्यंत संशोधकांनी काही निष्कर्ष काढला नसून त्यावर संशोधन सुरू आहे, अशी माहिती संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील भूगर्भशास्त्र विभागाचे प्रमुख सैय्यद खादरी यांनी दिली. खादरी हे भूगर्भशास्त्राचे आंतरराष्ट्रीय संशोधक आहेत.
४० ते ५५ मिलियन वर्षांपूर्वी नार्थ इंडियन प्लेट युरेशियन प्लेटला जाऊन टेकल्याने हिमालयासह नेपाळ व तिबेटची निर्मिती झाली. भारताचा भूगाग दरवर्षी ४.५ से.मीटरने सरकत आहे. ही प्रक्रिया निरतंर सुरुच आहे. त्यामुळे नेपाळ व भारतामध्ये भूकंपाचे हादरे जाणवत आहेत. 'थ्रस्ट फॉल्ट'मुळे दोन्ही भूगागाच्या सीमांवर दबाव वाढत असल्यामुळे भूकंपाचे हादरे बसत आहेत.
- सैय्यद खादरी,
भूगर्भशास्त्र विभागप्रमुख,
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ.