दारूड्याने चिमुरड्याला जमिनीवर आपटले
By Admin | Updated: October 25, 2014 02:01 IST2014-10-25T02:01:21+5:302014-10-25T02:01:21+5:30
दारूच्या नशेत पित्याने स्वत:च्या दीड वर्षाच्या मुलाला जमिनीवर आपटून निष्ठूर हत्या केल्याची घटना बडनेरा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पाळा गावात गुरुवारी रात्री उघडकीस आली.

दारूड्याने चिमुरड्याला जमिनीवर आपटले
अमरावती : दारूच्या नशेत पित्याने स्वत:च्या दीड वर्षाच्या मुलाला जमिनीवर आपटून निष्ठूर हत्या केल्याची घटना बडनेरा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पाळा गावात गुरुवारी रात्री उघडकीस आली. कृष्णा सुखदेव अहाळे असे मृत बालकाचे नाव आहे.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपी वडील सुखदेव कुंजीलाल अहाळे याला अटक केली आहे.
मध्य प्रदेशातील आठनेर तालुक्यातील ईरली आष्टी गावातील येथील रहिवासी सुखदेव अहाळे सध्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पाळा येथे राहतो. पाळ्यातील प्रकाश जोशी यांच्या वाडीमध्ये तो चौकीदार म्हणून कार्यरत आहे. २० आॅक्टोबर रोजी सायंकाळी सुखदेव व त्याची पत्नी कमला हे दोघेही बडनेरा येथील आठवडी बाजारात गेले होते. बाजारात सुखदेव याने मद्यप्राशन केले. त्यामुळे बाजारातील भाजीपाला व अन्य साहित्य खरेदी करण्याकरिता त्याच्याकडे पैसे उरले नव्हते. त्यामुळे पती-पत्नीमध्ये वाद झाला. बाजार आटपून दोघेही घरी परतले. रात्री ९ वाजता दरम्यान सुखदेव याची पत्नी कमला कृष्णाला दूध पाजत होती. मद्यधुंद अवस्थेतील सुखदेव याने कृष्णाला हिसकावून त्याच्या कपाळाला चावा घेतला व जमिनीवर आपटले. यामध्ये कृष्णाला गंभीर दुखापत झाली. त्याच्या पत्नीने तत्काळ कृष्णाला जखमी अवस्थेत नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना कृष्णाचा २२ आॅक्टोबर रोजी मृत्यू झाला. या घटनेची तक्रार कमला सुखदेव अहाळे यांनी २३ आॅक्टोबर रोजी पोलिसांत केली असून या प्रकरणी पोलिसांनी क्रुरक र्मा पिता सुखदेवला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक एस.बी. चिंचकर करीत आहेत. घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.