शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वऱ्हाडातील चार हजार गावांना दुष्काळ सवलतीतून डावलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2019 17:55 IST

यंदाच्या खरिपात ५० पेक्षा कमी पैसेवारीची २००७ गावे यापूर्वीच दुष्काळ जाहीर झालेल्या क्षेत्रातील आहेत. या पार्श्वभूमीवर महसूल विभागाने ८ जानेवारीला कमी पैसेवारीतील ९३१ गावांमध्ये दुष्काळसदृष्य स्थिती जाहीर करून आठ प्रकारच्या सवलती दिल्या.

अमरावती - यंदाच्या खरिपात ५० पेक्षा कमी पैसेवारीची २००७ गावे यापूर्वीच दुष्काळ जाहीर झालेल्या क्षेत्रातील आहेत. या पार्श्वभूमीवर महसूल विभागाने ८ जानेवारीला कमी पैसेवारीतील ९३१ गावांमध्ये दुष्काळसदृष्य स्थिती जाहीर करून आठ प्रकारच्या सवलती दिल्या. यामध्ये विभागात बुलडाणा जिल्ह्यातील २४६ गावांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त विभागतील ५० पेक्षा कमी पैसेवारीच्या चार हजार ६५ गावांना स्थान देण्यात आलेले नाहीत. शासनाकडून अन्याय झाल्याची भावना या गावांत आहे. 

विभागीय आयुक्तांनी  ३१ डिसेंबरला यंदाच्या खरिपाची अंतीम पैसेवारी जाहीर केली. यामध्ये अमरावती विभागात लागवडीयोग्य सात हजार २१६ गावांमध्ये ५० पेक्षा कमी पैसेवारी जाहीर करण्यात आली. विभागात यापूर्वी २८ तालुक्यांसह ४७ महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला. यामध्ये जून ते सप्टेंबरमध्ये पर्जन्याची तुट, उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरता, दूरसंवेदन विषयक निकष, वनस्पती निर्देशांक, मृदू आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र व पिकांची स्थिती या सर्व घटकांचा विचार करता शासनाने दुष्काळस्थिती जाहीर केली. ही परिस्थिती मागील दोन महिन्यांतील आहे. मात्र, पीक कापणी प्रयोगाअंती  जिल्ह्यात दुष्काळ जाहीर गावांव्यतिरिक्त ४,३११ गावांमध्ये खरिपाची पैसेवारी ५० पैशांचे आत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या सर्व गावांना दुष्काळाच्या सवलती देणे क्रमप्राप्त असताना शासनाने ३ जानेवारीच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीचा हवाला देत शासनादेश जारी केला. त्यामध्ये विभागातील ४,०६५ गावांना दुष्काळ स्थितीतून डावलल्याची बाब स्पष्ट झाली आहे. 

 कमी पैसेवारीच्या गावांना समान न्याय नाही  दुष्काळाच्या नव्या संहितेनुसार शासनाने ३१ आॅक्टोबरला विभागातील २८ तालुक्यात दुष्काळ जाहीर केला व त्यानंतर सहा नोव्हेंबरला ७५ टक्क्यांपेक्षा कमी पर्जन्यमानाच्या आधारावर विभागातील ४७ महसूल मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर केला. त्यानंतर आठ जानेवारी २०१९ रोजी राज्यातील ९३१ गावांमध्ये कमी पैैसेवारीच्या निकषाच्या आधारे दुष्काळ जाहीर केला. यामध्ये विभागातील ४,०६५ गावांमध्ये कमी पैसेवारी असताना एकाही गावाचा समावेश नसल्याने शासनाद्वारा दुष्काळी गावांना समान न्याय नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे.

टॅग्स :Amravatiअमरावतीdroughtदुष्काळ