पोळ्यावर दुष्काळाचे सावट
By Admin | Updated: August 26, 2014 23:04 IST2014-08-26T23:04:08+5:302014-08-26T23:04:08+5:30
शेतकऱ्यांचा जीवनसाथी असे बैलाला म्हटले जाते. शेतीच्या मशागतीची कामे बैलाच्या माध्यमातून होत असते. पोळयाच्या सणाला बळीराजा बैलांची पुजा करुन त्याला साज घालून पोळयात नेतात.

पोळ्यावर दुष्काळाचे सावट
संजय खासबागे - वरुड
शेतकऱ्यांचा जीवनसाथी असे बैलाला म्हटले जाते. शेतीच्या मशागतीची कामे बैलाच्या माध्यमातून होत असते. पोळयाच्या सणाला बळीराजा बैलांची पुजा करुन त्याला साज घालून पोळयात नेतात. स्थानिक केदारेश्वर मंदिराच्या प्रांगणात शेकडो वर्षाची परंपरा जोपासणारा पोळा यंदाही भरला. तहसीलदार राम लंके यांच्या हस्ते पोळ्याचे तोरण तोडण्यात आले. ेतोरणाखाली शेकडो बैलजोडयांनी हजेरी लावली होती. शहरात तीन ठिकाणी पोळे भरतात. यामध्ये कडूचे गोठाण, आणि राजुरा नाका परिसरात पोळा भरतो.
वर्षभर राबणाऱ्या बैलांना श्रृगांराने सजवून त्यांना गोडधोड खाऊ घालून पुजा केल्यानंतर पोळयात तोरणाखाली उभे राहण्यास नेतात. वेसन, घुंगरु, चवरे, दोर , झुला नवीन टाकल्या जातात. गळयातील रंगीबेरंबी माळा तर शिंगाना रंगरंगोटी करुन नववधूप्रमाणे सजविल्या जाते. केदारेश्वर मंदिराच्या प्रांगणात शेकडो वर्षांपासून पोळा पारंपारीक पध्दतीने साजरा होतो. येथे तोरण बांधल्या जाते आणि तोरण बांधण्याचा मान आंडे परिवाराला असतो. यान कुटुुंबाकडून आयोजन केल्या जाते. कडूचे गोठाण आणि राजूरानाका परिसरातील पोळयामध्ये सुध्दा शेकडो जोडया हजर झाल्या होत्या. शहरातील तिन पोळयाचा कार्रुक्रम शांतते पार पडला. मात्र बदलत्या काळात गोधनावर संकट उभे ठाकल्याने बैलांची संख्या दिवसेंदिवस रोडावत आहे. मात्र, पोळयाची परंपरा शेकडो वर्षानंतरही निरंतर सुरु आहे. यामुळे ेया ऐतिहासिक पोळयाला अधिक महत्व आहे. यावेळी निळकंठ आंडे, वसुधा बोंडे, रमेश देशमुख, केदारेश्वर संस्थानचे ,अनिल जावळे, तहसीलदार राम लंके, नायब तहसीलदार कमलाकर देशमुख, एम.के.असनानी. रासेकर, ठाणेदार अर्जुन ठोसरे, शैलेश शेळके, उपनिरीक्षक सुबोध वंजारी, संगीता गावडे, शेख आदी उपस्थित होते.