जीर्ण इमारतीमुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

By Admin | Updated: July 29, 2015 00:22 IST2015-07-29T00:22:51+5:302015-07-29T00:22:51+5:30

कृषक सुधार मंडळ द्वारा संचालित माध्यमिक कन्या विद्यालयाच्या जीर्ण झालेल्या इमारतीत विद्यार्थिनी जीव मुठीत घेऊन शिक्षणाचे धडे गिरवीत आहेत.

Due to the dilapidated building, the danger of the lives of the students | जीर्ण इमारतीमुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

जीर्ण इमारतीमुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

तळेगाव दशासर : कृषक सुधार मंडळ द्वारा संचालित माध्यमिक कन्या विद्यालयाच्या जीर्ण झालेल्या इमारतीत विद्यार्थिनी जीव मुठीत घेऊन शिक्षणाचे धडे गिरवीत आहेत.
धामणगाव तालुक्यातील तळेगाव येथे जि.प. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आहे. परिसरातील मुलींना मुक्तपणे शिक्षण घेता यावे म्हणून शिक्षण महर्षी बापूसाहेब देशमुख यांनी सन २०८३-८४ मध्ये कृषक सुधार मंडळाद्वारे माध्यमिक कन्या विद्यालय स्वत:चे जुन्या मातीचे जागेत सुरू केले. सुमारे ३१ वर्षांपासून शेकडो विद्यार्थिनींनी शिक्षणाचा लाभ घेतला.
यंदा या शाळेचा दर्शनी भाग कोसळला असून दक्षिण-पश्चिम भागाची भिंत पडली आहे. तसेच दक्षिणेकडील मुख्य इमारतीची मागील पूर्ण भिंत शिकस्त असल्याने कधीही अपघात होऊ शकते.
या शाळेत ५ ते १० पर्यंत वर्ग असून शेकडो विद्यार्थिनी व शिक्षक वृंद जीव मुठीत घेऊन शिक्षणाचे धडे गिरवीत आहेत. याबाबत शाळा समितीने कृषक सुधार मंडळ अध्यक्षांना पत्राद्वारे कळविले आहे.

Web Title: Due to the dilapidated building, the danger of the lives of the students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.