मागण्या मंजूर, जिल्हा बॅक कर्मचाऱ्यांचा संप मिटला
By Admin | Updated: May 21, 2015 00:31 IST2015-05-21T00:31:21+5:302015-05-21T00:31:21+5:30
स्थानिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्मचाऱ्यांनी नऊ दिवसांपासून संप पुकारला होता.

मागण्या मंजूर, जिल्हा बॅक कर्मचाऱ्यांचा संप मिटला
पालकमंत्र्याची मध्यस्थी : गुरूवारपासून व्यवहार सुरळीत
अमरावती : स्थानिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्मचाऱ्यांनी नऊ दिवसांपासून संप पुकारला होता. पालकमंत्र्यांच्या मध्यस्थीने तो मागे घेण्यात आला. बँकेचे संचालक, अधिकारी व कर्मचाऱ्यांची गऱ्हाणी ऐकून घेतल्यानंतर ३६ टक्के महागाई भत्ता देण्याचा निर्णय झाला. पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या यशस्वी शिष्टाईने कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला. ठप्प पडलेले बँकेचे आर्थिक व्यवहार व कामकाज गुरूवारपासून सुरळीत होणार आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात २० मे रोजी पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीला जिल्हाधिकारी किरण गित्ते, जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे, बॅकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी जे.सी राठोड, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे संचालक प्रकाश काळबांडे, संजय वानखडे सुभाष पावडे, प्रवीण काशिकर, रविंद्र गायगोले, नितीन हिवसे, अभिजीत ढेपे, निवेदिता चौधरी, तर बॅक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष व्हि.टी.टेकाडे, प्रभाकर किल्लोर, कार्याध्यक्ष अनंत सोमवंशी, आदीची उपस्थिती होती.
संप कालावधीत शेतकरी कर्जदार, ठेवीदार कर्मचारी यांना जो गैरसोयीमुळे मन:स्ताप झाला त्याबाबत दिलगिरी व्यक्त करीत गुरूवारी बँकेच्या सर्वशाखांमधील कर्मचारी कामावर हजर होऊन सायंकाळी सात वाजेपर्यंत कामकाज करणार आहेत.
- अनंत सोमवंशी,
कार्याध्यक्ष बँक कर्मचारी संघटना.