मागणी नसल्याने संत्रा उत्पादकांचे स्वप्न भंगणार !
By Admin | Updated: July 11, 2016 00:12 IST2016-07-11T00:12:27+5:302016-07-11T00:12:27+5:30
तालुक्यात संत्रा कलमांच्या विक्रीतून शेतकऱ्यांकडे लाखो रुपये येत होते. परंतु तालुक्यात संत्रा कलमांची निर्मिती...

मागणी नसल्याने संत्रा उत्पादकांचे स्वप्न भंगणार !
फटका : संत्रा कलमा शिलकीची शक्यता, नर्सरीधारकांवर चिंतेचे सावट
वरुड : तालुक्यात संत्रा कलमांच्या विक्रीतून शेतकऱ्यांकडे लाखो रुपये येत होते. परंतु तालुक्यात संत्रा कलमांची निर्मिती सव्वा कोटींच्याजवळ असूनही मागणी नसल्याने कोट्यवधी रुपयांचा फटका बसण्याची वेळ आली आहे. त्यामुळे संत्रा कलमा उत्पादकांचे स्वप्न भंग पाण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
यावर्षी समाधानकारक पाउस पडल्यास संत्रा कलमा उत्पादकांना सुगीचे दिवस येतील, असा अंदाज वर्तविला जात असला तरी भाव हे १५ ते २० रुपये प्रति कलम मिळत असल्याने उत्पादन खर्च काढणे कठीण आहे. शासनाने फलोत्पादन योजनेचे परमीट देणे बंद केल्याने शासकीय खरेदी बंद आहे. शासनाची अनास्था आणि राजाश्रय नसल्याने संत्रा कलमा उत्पादकांची फरफट सुरू असल्याने नर्सरीधारकांचा व्यवसाय मोडीत निघण्याची शक्यता उत्पादकांकडून वर्तविण्यात येत आहे.
कलमा निर्मितीची प्रक्रिया
नोव्हेंबर ते जानेवारीमध्ये डोळे बांधणी केली जाते. सदर्हू रोपटे ८ ते ९ इंच अंतरावर शेतामध्ये लावले जाते. त्यावर दोन ते ३ वर्षांच्या संत्रा झाडावरील डोळा (कलम) काढून ते या रोपट्यावर चढविले जाते. जंभेरीच्या रोपट्यावर संत्राकरिता रंगपूर लाईम, मोसंबीकरिता न्युसेलर हैद्राबादी, गावरानी कलम चढविले जाते. जूनपासून या कलमाची जोपासना केली जाते. या कलमाची वाढ होण्यास आणि विक्रीस उपलब्ध होईपर्यंत दीड वर्षांचा अवधी लागतो. अशापद्धतीने संत्रासह लिंबूवर्गीय कलमा शास्त्रोक्त पद्धतीने कलमांची निर्मीती होते. संत्रा कलमा तयार करण्याकरिता १२ ते १५ रुपये खर्च येतो. यावर्षी संत्रासह निंंबूवर्गीय कलमाचे सुमारे दीड ते दोन कोटींच्या घरात उत्पादन आहे. कृषी विभागाने डी.एन.ए चाचणी करूनच संत्रा, मोसंबी आणि लिंंबूवर्गीय कलमांचे उत्पादन केले जाते. कलमांच्या खरेदीकरिता राजस्थान, मध्यप्रदेशासह देशाच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी येतात. विविध राज्यांच्या कृषि विभागाच्यावतीने येथून परवान्यावर खरेदी केली जाते. यातून जून ते सप्टेंबरपर्यंत कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. तालुक्यात २७५ परवानाधारक नर्सरी तर तेवढेच विनापरवाना संत्रा कलमा निर्मिती करणारे आहे. शेतजमिनीमध्ये (विघा) २० आर पासून तर ४०-५० आर जमिनीवर लागवड केली जाते. यावर्षी दीड ते दोन कोटी संत्रा कलमा निर्मीचे कार्य नर्सरीधारक करीत आहे. विदर्भाचा कॅलीफोर्निया म्हणून नावलौकीक मिळविलेल्या वरुड तालुक्यावर नैसर्गिक ते कृत्रिम असे संकट सातत्याने येत असते. यावर्षी नोव्हेंबरपासून जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जंभेरीवर डोळा लावण्याचे काम झाले. शासकीय खरेदी फलोत्पादन योजनेअंतर्गत परवानावर कलमाचे प्रती कलम दर २५ रुपये आहे. शासकीय दरानुसार २५ रुपये भाव मिळतो, तर खासगी खरीददार ३० ते ४० रुपयांना कलमा विक्री करतात. परंतु गत वषर्भपाूसन भाव पडल्याने कलमा उत्पादक अडचणीत येत आहे. नर्सरीधारकांना लाखोंचा फटका बसण्याची शक्यता आहे. (तालुका प्रतिनिधी)