पूर्णा प्रकल्पाच्या हलगर्जीपणामुळे शेतकरी त्रस्त
By Admin | Updated: November 29, 2015 00:53 IST2015-11-29T00:53:17+5:302015-11-29T00:53:17+5:30
येथील पूर्णा मध्यम प्रकल्प उपविभाग क्र. ४ उपलघुपाट आर रसिकपूर हद्दीतील शेतशिवारातील कालव्याची मुख्य पाईपलाईन २०१४ पासून फुटलेली आहे.

पूर्णा प्रकल्पाच्या हलगर्जीपणामुळे शेतकरी त्रस्त
बेलोरा : येथील पूर्णा मध्यम प्रकल्प उपविभाग क्र. ४ उपलघुपाट आर रसिकपूर हद्दीतील शेतशिवारातील कालव्याची मुख्य पाईपलाईन २०१४ पासून फुटलेली आहे. त्यामुळे आजूबाजूच्या शेतातील पाण्याच्या पार्इंटपर्यंत पाणी पोहोचत नाही. याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी १ आॅक्टोबर २०१४ रोजी संबंधित अधिकाऱ्यांना लेखी तक्रार दिली होती. पण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मुख्य पाईपलाईन दुरूस्त करण्यात आली नाही. मागील वर्षी रबी पिकांचे नुकसान झाले. आता चालू रबी पिकांचे नुकसान होऊ नये, म्हणून पुन्हा लेखी तक्रार दिली. परंतु अधिकाऱ्यांच्या निगरगट्ट भूमिकेमुळे यावर्षीसुद्धा संबंधित विभागाने पाईपलाईनची दुरूस्ती केलेली नाही. त्यामुळे यंदाच्या अपुऱ्या पावसामुळे हवालदिल झालेले शेतकरी खरीप नाही तर रबी पिके तरी साथ देईल, या आशेवर पुन्हा त्रस्त शेतकऱ्यांनी २६ आॅक्टोबर रोजी तक्रार दिली. पण आता रबी पिकेही अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे हातून जाण्याची चिन्हे आहे. या समस्येकडे संबंधित अधिकाऱ्याने जातीने लक्ष देऊन त्यांची समस्या दूर करावी, अन्यथा शेतकरी आंदोलन करावे लागेल, असा इशारा दिला आहे. दीपक रामराव कोंडे हा शेतकरी वर्षभरापासून फुटलेल्या पाईपलाईनच्या तक्रारीत देत आहे. त्यात या शेतकऱ्यांच्या रबी पिकांचे नुकसानही झाले आहे. मात्र या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. आता मात्र आंदोलनाशिवाय पर्याय नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. (वार्ताहर)