मद्यधुंद महिलेची तान्हुल्याला घेऊन भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 05:01 IST2020-08-29T05:00:00+5:302020-08-29T05:01:22+5:30
२८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजताच ती एका दारू विक्रीच्या दुकानापुढे मद्यधुंद स्थितीत बाळाला बेवारस ठेऊन बसली होती. येथील दी ग्रेट मराठा फाउंडेशनचे अध्यक्ष नितीन गुर्जर यांनी हा प्रकार तहसीलदार सुनील सावंत यांना सांगितला. तहसीलदारांनी हा प्रकार पालिकेच्या कानावर घातला.

मद्यधुंद महिलेची तान्हुल्याला घेऊन भटकंती
लोकमत न्यूज नेटवर्क
वरुड : दीड वर्षांच्या तान्हुल्याला घेऊन शहरात मद्यधुंद अवस्थेत भटकंती करणाऱ्या महिलेस सामाजिक कार्यकर्र्त्यांनी सुधारगृहात पाठविले. आठ दिवसांपासून ३० ते ३५ वर्षे वयोगटातील ती मद्यधुंद महिला अनेकवेळा कोसळली. तिचे तान्हुले बाळ मात्र रडून आक्रोश करीत होते. त्यानंतर सांघिक प्रयत्नाने तिची समजूत काढण्यात आली.
२८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजताच ती एका दारू विक्रीच्या दुकानापुढे मद्यधुंद स्थितीत बाळाला बेवारस ठेऊन बसली होती. येथील दी ग्रेट मराठा फाउंडेशनचे अध्यक्ष नितीन गुर्जर यांनी हा प्रकार तहसीलदार सुनील सावंत यांना सांगितला. तहसीलदारांनी हा प्रकार पालिकेच्या कानावर घातला. प्रभारी मुख्याधिकारी गजानन भोयर आणि ठाणेदार मगन मेहते यांनी तिला आणि तिच्या मुलाला अमरावतीच्या चाईल्ड हेल्पलाईनच्या ताब्यात दिले. रुग्णवाहिकेतून तिला तिच्या तान्हुल्यासह अमरावतीत नेण्यात आले. सदर महिला कोण आणि कुठली याबाबतची माहिती मिळू शकली नाही. ती रश्मी असे नाव आणि तळेगाव हे गाव सांगत होती.