मद्यपी मुलाने वडिलांच्या गळ्यावर चालविला सत्तूर

By प्रदीप भाकरे | Published: March 8, 2023 12:48 PM2023-03-08T12:48:23+5:302023-03-08T12:49:04+5:30

मार्की येथील घटना : हत्येप्रकरणी मुलाला अटक, होळीला गालबोट 

Drunken son drives Sattur on his father's neck | मद्यपी मुलाने वडिलांच्या गळ्यावर चालविला सत्तूर

मद्यपी मुलाने वडिलांच्या गळ्यावर चालविला सत्तूर

googlenewsNext

अमरावती: होळीच्या दिवशी रात्री गावातील चौकात दारू पिऊन धुडगुस घालणाऱ्या मुलाने त्याला हटकणाऱ्या जन्मदात्याच्या गळ्यावर सत्तूर चालविला. यात ते वृद्ध वडिल जागीच गतप्राण झाले. भातकुली तालुक्यातील मार्की येथे ६ मार्च रोजी रात्री ११.३० च्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. सुरेश देशमुख (७५, रा. मार्की) असे मृत वृध्दाचे नाव आहे. याप्रकरणी मृताच्या धाकट्या मुलाच्या तक्रारीवरून वलगाव पोलिसांनी आरोपी मुलगा गोपाळ सुरेश देशमुख (४०, रा. मार्की) याच्याविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला त्वरेने अटक केली. याप्रकरणी ७ मार्च रोजी सकाळी ९.४६ च्या सुमारास एफआयआर नोंदविण्यात आला.

तक्रारीनुसार, आरोपी गोपाळ देशमुख हा ६ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास दारू पिऊन गावातील चौकात जोरजोराने शिवीगाळ करीत होता. ही बाब गावकऱ्यांनी त्याचे वडिल सुरेश देशमुख यांना सांगितली. त्यामुळे ते मुलाला समजावून घरी आणण्यासाठी चौकात गेले. तू नेहमीच भांडण करत असल्याने आमची गावात बदनामी झाली आहे. बेअब्रू झाली आहे. त्यामुळे तू शिवीगाळ करू नकोस, असे सुरेश देशमुख यांनी सर्वांसमक्ष त्याला बजावले. त्यावेळी म्हाताऱ्या तुला बघून घेतो, असे म्हणून गोपाळ तेथून निघून गेला.

अशी घडली घटना
६ मार्च रोजी रात्री ११.३० च्या सुमारास सुरेश देशमुख हे धाकटा मुलगा अमोल (३५) याच्यासह घरी बसलेले असताना आरोपी गोपाळ घरी आला. माझ्यामुळे तुझी इज्जत गेली का, अशी विचारणा करत त्याने वडिल सुरेश देशमुख यांच्या गळ्यावर लोखंडी सत्तरने वार केला. यात ते घटनास्थळीच ठार झाले. त्यावेळी अमोलने मोठ्या भावास अडविले. त्याला वडिलांपासून दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी लहान भावाला ठार मारण्याची धमकी देत आरोपी घरातून पसार झाला. दरम्यान, सुरेश देशमुख यांना तातडीने जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

Web Title: Drunken son drives Sattur on his father's neck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.