मद्यधुंद चालकाने कन्टेनर धडकविले रेल्वे क्रासिंगच्या पोलवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 22:35 IST2018-10-28T22:35:06+5:302018-10-28T22:35:46+5:30
मद्यधुंद चालकाने मालवाहू कन्टेनर रेल्वे क्रॉसिंगच्या सुरक्षा पोलवर धडकले. ही घटना शनिवारी सायंकाळी बडनेरा हद्दीतील जुनीवस्तीत घडली. बडनेरा पोलिसांनी पाठलाग करून कन्टेनरला रानमाळसमोर ताब्यात घेतले.

मद्यधुंद चालकाने कन्टेनर धडकविले रेल्वे क्रासिंगच्या पोलवर
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मद्यधुंद चालकाने मालवाहू कन्टेनर रेल्वे क्रॉसिंगच्या सुरक्षा पोलवर धडकले. ही घटना शनिवारी सायंकाळी बडनेरा हद्दीतील जुनीवस्तीत घडली. बडनेरा पोलिसांनी पाठलाग करून कन्टेनरला रानमाळसमोर ताब्यात घेतले.
कन्टेनर क्रमांक पीबी-१३-एडब्ल्यू-६६६२ भरधाव वेगाने हायवेकडे जात असल्याच्या माहितीवरून शनिवारी सायंकाळी बडनेराचे ठाणेदार शरद कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनात पीएसआय गणेश अहिरेंचे पोलीस पथक तत्काळ घटनास्थळी रवाना झाले. पोलिस पाठलाग करीत असताना चालक कन्टेनर सिनेस्टाईल पळवित होता. पोलिसांनी कन्टेनरला रानमाळजवळ गाठून चालक कप्तानसिंग गजेंद्रसिंग तोमर (रा.कुटीला, राज्य मध्यप्रदेश) याला ताब्यात घेतले. त्यावेळी त्याच्याकडून चालणे सुध्दा होत नव्हते. अशा मद्यधुंद अवस्थेत चालक भरगच्च मालाने भरलेला कन्टेनर चालवीत होता. मैने बहोत लोगोको उडाया, असे भाष्य चालक पोलिसांसमोर करीत होता. कन्टेनरच्या मध्यभागाचा पूर्ण चुराडा झाला होता. त्यामुळे कन्टेनरने अनेक जागी धडक दिल्याचे दिसून येत होते. पोलिसांनी चालकास अटक करून त्याच्याविरुद्ध भादंविच्या कलम २७९, १८५ मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा नोंदविला आहे.