पाचव्या दिवशीही पावसाची रिपरिप सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:11 IST2021-07-26T04:11:50+5:302021-07-26T04:11:50+5:30
अमरावती : जिल्ह्यात २४ तासांत सार्वत्रिक ६.६ मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात २१ तारखेपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. यंदाच्या ...

पाचव्या दिवशीही पावसाची रिपरिप सुरूच
अमरावती : जिल्ह्यात २४ तासांत सार्वत्रिक ६.६ मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात २१ तारखेपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. यंदाच्या पावसाळ्यात ३३३.१ मिमी पाऊस अपेक्षित असताना आतापर्यंत ४४३.२ मिमी पावसाची नोंद झालेली आहे. ही टक्केवारी १३१ आहे.
या आठवड्यात धारणी तालुक्यातील पाचही महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. पावसाने जिल्ह्यातील ३२ गावे बाधित झाली. यात २६२ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले, तर ४६ घरांची पडझड झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
मुसळधार पावसाने भातकुली तालुक्यातील १७ गावे बाधित झाली. यामध्ये ८८ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले. अंजनगाव सुर्जी तालुक्यात १५ गावांमध्ये ३८ घरांची पडझड व ६८ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले. याशिवाय चिखलदरा तालुक्यात आठ घरे व १०८ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झालेले आहे. धारणी तालुक्यातील धारणी, हरिसाल, धूळघाट, सावलीखेडा व साद्राबाडी या महसूल मंडळांत अतिवृष्टी झालेली असताना घरे व पिकांचे नुकसान निरंक आहे.
बॉक्स
आतापर्यंत तालुकानिहाय पाऊस
जिल्ह्यात आतापर्यंत ४३६.५ मिमी पावसाची नोंद झाली. यामध्ये धारणी तालुक्यात ४२४.७ मिमी, चिखलदरा ४२३.४, अमरावती ३४५, भातकुली ३९, नांदगाव खंडेश्वर ४४५.९, चांदूर रेल्वे ४५९.२, तिवसा ३२३.८, मोर्शी ३२८.१, वरूड ४०९, दर्यापूर ४४५.२, अंजनगाव सुर्जी ४८०.१, अचलपूर ३५७.६, अंजनगाव सुर्जी ४८०, अचलपूर ३५७.६ चांदूर बाजार ३४१ व धामणगाव तालुक्यात ४०४.१ मिमी पावसाची नोंद झाली.