वाहनचालकाची मोटार वाहन उपनिरीक्षकांना धक्काबुक्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:14 IST2021-03-08T04:14:10+5:302021-03-08T04:14:10+5:30
अमरावती : वाहन तपासणी करताना वाहनचलाकासह दोघांनी आरटीओच्या मोटर वाहन उपनिरीक्षकांशी वाद घालून हुज्जतबाजी केली तसेच त्यांना धक्काबुक्की ...

वाहनचालकाची मोटार वाहन उपनिरीक्षकांना धक्काबुक्की
अमरावती : वाहन तपासणी करताना वाहनचलाकासह दोघांनी आरटीओच्या मोटर वाहन उपनिरीक्षकांशी वाद घालून हुज्जतबाजी केली तसेच त्यांना धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दोघांवर राजापेठ पोलिसांनी गुन्हा नोंदविला. ही घटना बडनेरा जुना बायपास मार्गावर शनिवारी घडली.
अब्दुल फईम अब्दुल रहीम, अनिस खान अजीज खान (दोन्ही रा. कॅम्प अमरावती) असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादी आरटीओ मोटार वाहन उपनिरीक्षक नितीन लक्ष्मण सावंत (४३, रा. विसावा कॉलनी अमरावती) यांनी राजापेठ ठाण्यात तक्रार नोंदविली. आरोपीविदरुद्ध भादंविचे कलम ३५३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला. फिर्यादी हे कर्तव्यावर असताना त्यांनी आरोपीच्या एमएच ०४ एजी २०३९ या वाहनाच्या कागतपत्राची तपासाकरिता वाहन थांबविले असता, आरोपीने शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. पुढील तपास पीएसआय किसन मापारी करीत आहेत.