रेलर उलटून चालक ठार

By Admin | Updated: January 12, 2017 00:08 IST2017-01-12T00:08:46+5:302017-01-12T00:08:46+5:30

अमरावती-यवतमाळ मार्गावरील फुबगाव फाट्याजवळ ट्रेलर उलटून चालक ठार झाला. ही घटना बुधवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घडली.

The driver collapsed and the driver died | रेलर उलटून चालक ठार

रेलर उलटून चालक ठार

फुबागावनजीकची घटना : वाहतुकीचा खोळंबा
नांदगाव खंडेश्वर : अमरावती-यवतमाळ मार्गावरील फुबगाव फाट्याजवळ ट्रेलर उलटून चालक ठार झाला. ही घटना बुधवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घडली.
एम.एच.४० ए.के. १८८५ क्रमांकाचे चौदा चाकी ट्रेलर गुजरातवरून बुटीबोरी येथे कारखान्यासाठी पीटीए पावडर घेऊन जात होते. दरम्यान चालकाचे संतुल बिघडल्याने हे ट्रेलर उलटले. घटनेची माहिती मिळताच नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक धीरज राऊत, वाहतूक पोलीस लखन हटवार, विलास चव्हाण घटनास्थळी पोहोचले. त्यांनी ट्रेलरखाली दबलेल्या चालकाला बाहेर काढण्यासाठी गॅसकटर व जेसीबी मशीन बोलविली. मात्र, वृत्तलिहेपर्यंत ट्रेलरचालकाचे नाव कळू शकले नाही. काही वेळ वाहतूक अवरूद्ध झाली होती. घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The driver collapsed and the driver died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.