दोन अल्पवयीनांच्या अपघातप्रकरणी चालकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:32 IST2021-02-05T05:32:08+5:302021-02-05T05:32:08+5:30

आसेगाव पूर्णा : टाकरखेडा पूर्णा येथे झालेल्या अपघातातील आरोपी पिकअपचालकाला आसेगाव पूर्णा पोलिसांनी शुक्रवारी उशिरा रात्री अटक केली. या ...

Driver arrested in accident involving two minors | दोन अल्पवयीनांच्या अपघातप्रकरणी चालकाला अटक

दोन अल्पवयीनांच्या अपघातप्रकरणी चालकाला अटक

आसेगाव पूर्णा : टाकरखेडा पूर्णा येथे झालेल्या अपघातातील आरोपी पिकअपचालकाला आसेगाव पूर्णा पोलिसांनी शुक्रवारी उशिरा रात्री अटक केली. या अपघातात स्कूटीवरील दोघे अल्पवयीन होरपळून दगावले. यानंतर चालकाने घटनास्थळावरून पलायन केले होते.

अमरावती-परतवाडा मार्गावर झालेल्या या अपघातात शुक्रवारी सायंकाळी ६ च्या सुमारास निवृत्ती दीपक सोलोव (१४) याचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर सार्थक अनंतराव वैद्य (१६) याचा अमरावती येथे उपचारासाठी नेत असताना वाटेत मृत्यू झाला. स्कूटला धडक देणाऱ्या एमएच २७ बीएक्स ३८१२ क्रमांकाच्या पिकअप वाहनाचा चालक योगेश सुभाष सगणे याला आसेगाव पोलिसांनी निंभारी येथील घरूनच शुक्रवारी रात्री ताब्यात घेतले. त्यांना भादंविचे कलम ३०४ अ, २७९ अन्वये गुन्हा दाखल केला.

दरम्यान, निवृत्ती व सार्थक यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी २ वाजता त्यांच्या गावी तळणी पूर्णा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. सुमारे सव्वादोनशे लोकवस्तीच्या या गावातील एकाही घरात चूल पेटली नव्हती.

Web Title: Driver arrested in accident involving two minors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.