सभापतिपदाचे स्वप्न विरले
By Admin | Updated: May 15, 2015 00:12 IST2015-05-15T00:12:06+5:302015-05-15T00:12:06+5:30
लोकप्रतिनिधींविरुद्धची तक्रार असल्यास थेट उच्च न्यायालयात दाद न मागता अगोदर जिल्हा सत्र न्यायालयात जाण्याचा सल्ला उच्च न्यायालयाने दिला.

सभापतिपदाचे स्वप्न विरले
अमरावती : लोकप्रतिनिधींविरुद्धची तक्रार असल्यास थेट उच्च न्यायालयात दाद न मागता अगोदर जिल्हा सत्र न्यायालयात जाण्याचा सल्ला उच्च न्यायालयाने दिला. आशियाबानो या जिल्हा सत्र न्यायालयात गेल्या असता प्रारंभी हे प्रकरण महापालिका आयुक्तांच्या पुढ्यात घेऊन जाण्याचा सल्ला कोर्टाने दिला. त्यानुसार पाच अपत्यांचे प्रकरण हे तत्कालीन महापालिका आयुक्त अरुण डोंगरे यांच्याकडे सुनावणीसाठी असताना आशियाबानो यांच्या वकिलांनी या प्रकरणाचा न्याय निवाडा करण्याचे अधिकार आयुक्तांना नाहीत, असा युक्तिवाद केला. त्यानुसार जिल्हा सत्र न्यायालयाने महापालिका आयुक्तांचे म्हणणे खारीज केले. सध्या हे प्रकरण उच्च न्यायालयात असताना आशियाबानो यांनी नवे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्याकडे न्यायासाठी धाव घेतली. आयुक्त गुडेवार यांनी या प्रकरणाचा खोलात तपास केला असता नगरसेविका शमीमबानो या पदावर राहू शकत नाही, असा निर्वाळा देत महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९ चे कलम १० आय नुसार सदस्य अनर्ह अदेश बजावण्यात आला आहे. हा आदेश आयुक्तांच्या स्वाक्षरीने काढण्यात आला असून बुधवारी उशीरा रात्री शमीमबानो सादिक आयडीया यांना सदस्य रद्द करण्याची नोटीस बजावली आहे. महापालिका इतिहासात अपत्यप्रकरणी सदस्यावर थेट कारवाई करण्याची घटना ही पहिल्यांदाच घडली आहे. या कारवाईमुळे सदस्यांमध्ये जणू राजकीय भूकंप झाला आहे.
आसिफ हुसेन यांच्यावरही गंडांतर!
राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटचे स्वीकृत सदस्य आसिफ हुसेन यांच्यावरही सदस्य गमावण्याची पाळी येण्याचे संकेत आहेत. माजी नगरसेवक सलिम बेग यांनी महापालिका आयुक्तांकडे आसिफ हुसेन यांना २००१ नंतर तिसरे अपत्य असल्याची तक्रार दिली आहे. या तक्रारीवर चौकशी सुरु असून सोमवारपर्यंत आसिफ हुसेन यांच्याविरोधात असलेल्या तक्रारीवर आयुक्त गुडेवार हे निर्णय देतील, अशी दाट शक्यता आहे.
बुधवारी विधी सभापती अन् गुरुवारी सदस्यत्व रद्द
शमीमबानो सादिक आयडीया यांची बुधवारी विधी समिती सभापतीपदी वर्णी लागली. हा आनंद साजरा करीत असताना गुरुवारी त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आल्याची वार्ता कानी पडताच त्यांच्या समर्थकांनी विरोधकांना चांगलेच शिव्याशाप केल्याची माहिती आहे. विधी सभापतीपद मिळाल्याचा आनंद अन् पदग्रहण सोहळ्याचे नियोजन आखत असतानाच त्यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने राष्ट्रवादीच्या गोटात विरजण पडले आहे.