सोयाबीन उत्पादनात कमालीची घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 05:00 IST2020-10-09T05:00:00+5:302020-10-09T05:00:35+5:30

यंदा पेरणी, रासायनिक खते, तणनाशक-कीटकनाशक फवारणी, डवरणी, सततच्या पावसामुळे तण वाढल्याने केलेले निंदण आदी कामांवर करण्यात आलेला खर्च आवाक्याबाहेर असतानाही भरघोस उत्पादनाच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी वहन केला. त्यात यंदा कित्येक शेतात पेरणी केलेले सोयाबीन बियाणे उगवले नव्हते. तालुक्यातील अशा शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. त्यावर झालेला अतिरिक्त खर्च वेगळाच.

Dramatic decline in soybean production | सोयाबीन उत्पादनात कमालीची घट

सोयाबीन उत्पादनात कमालीची घट

ठळक मुद्देउत्पादन खर्च निघणे कठीण : नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेतकरी हवालदिल

संजय जेवडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदगाव खंडेश्वर : सोयाबीन कापणीचा हंगाम सुरू झाला आहे. मात्र, पेरणी ते मळणीपर्यंतच्या कालावधीतील दगदगीचे मोल शेतकऱ्यांना मिळाले नाही. सुरुवातीचे निकृष्ट बियाणे अतिवृष्टी, खोडकीड यातून उरलेले अत्यल्प सोयाबीन घरी आले. यंदा सोयाबीनचा उतारा मिळाला नसल्याची तालुक्यातील शेतकऱ्यांची सार्वत्रिक ओरड आहे.
यंदा पेरणी, रासायनिक खते, तणनाशक-कीटकनाशक फवारणी, डवरणी, सततच्या पावसामुळे तण वाढल्याने केलेले निंदण आदी कामांवर करण्यात आलेला खर्च आवाक्याबाहेर असतानाही भरघोस उत्पादनाच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी वहन केला. त्यात यंदा कित्येक शेतात पेरणी केलेले सोयाबीन बियाणे उगवले नव्हते. तालुक्यातील अशा शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. त्यावर झालेला अतिरिक्त खर्च वेगळाच.
यावर्षी एकाच वेळी सोयाबीन कापणीचा हंगाम आल्याने मजुरीचे दरही वाढलेले आहे. त्यात उत्पादनात झालेली घट पाहता, कित्येक शेतकऱ्यांचा खर्चही निघणे कठीण आहे. आता पीक विम्याच्या मदतीकडे शेतकऱ्यांच्या आशाळभूत नजरा लागल्या आहेत.

२५ एकरांचा सोयाबीनचा पेरा आहे. त्यातील १५ एकरची कापणी व मळणी यंत्राद्वारे सोयाबीन काढले. एकरी अडीच क्विंटलचे उत्पादन हाती आले.
- अतुल घोडे, शेतकरी, एरंडगाव

बटईच्या शेतात चार एकर सोयाबीनचा पेरा होता. त्याची कापणी करून मळणी केली. फक्त १२ क्विंटल सोयाबीन झाले. कुटुंबीयांच्या परिश्रमाला हे उत्पन्न पुरेसे नाही.
- नीलेश जेठे, शेतकरी, पहूर

कणी मिझार्पूर शिवारातील शेतात ३० बॅग सोयाबीनचा पेरा आहे. त्यापैकी ११ बॅगची कापणी व मळणी झाली. त्यात एकरी तीन क्विंटलचे उत्पादन झाले आहे. पुढील आर्थिक व्यवहार कसा करावा, याची चिंता लागली आहे.
- विलास सावदे, संचालक कृषिउत्पन्न बाजार समिती, नांदगाव खंडेश्वर.

अजमदपूर, फुबगाव व येणस शिवारात २५ बॅग सोयाबीनची पेरणी होती. त्यापैकी ११ एकरांतील सोयाबीनची कापणी करून मळणी केली. त्यात फक्त ३२ क्विंटल सोयाबीनचे उत्पादन घरी आले.
- राजेंद्र वासुदेव कणसे,
शेतकरी, येणस

जगतपूर शिवारात वेगवेगळ्या नावे असलेल्या शेतात आठ एकर सोयाबीनची पेरणी होती. त्यात एकरी तीन क्विंटल सोयाबीन मिळाले. १५ दिवसांपूर्वी पीक विम्यासाठी दावा दाखल केला होता. अद्याप पाहणी झाली नाही.
- मनोहर बगळे, शेतकरी, गोळेगाव

Web Title: Dramatic decline in soybean production

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती