पावसाळ्यात शिवाजीनगरातील नालीचे सांडपाणी नागरिकांच्या घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:09 IST2021-07-02T04:09:53+5:302021-07-02T04:09:53+5:30

नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार चांदूर रेल्वे : पावसाळ्यात शिवाजीनगरमधील नालीचे सांडपाणी थेट एका नागरिकाच्या घरात शिरते. यंदाही तोच प्रकार ...

Drainage in Shivajinagar during monsoon | पावसाळ्यात शिवाजीनगरातील नालीचे सांडपाणी नागरिकांच्या घरात

पावसाळ्यात शिवाजीनगरातील नालीचे सांडपाणी नागरिकांच्या घरात

नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार चांदूर रेल्वे : पावसाळ्यात शिवाजीनगरमधील नालीचे सांडपाणी थेट एका नागरिकाच्या घरात शिरते. यंदाही तोच प्रकार होण्यापूर्वी त्यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली आहे.

चांदूर रेल्वे शहरात रेल्वे गेटजवळ उड्डाणपूल व बाजूला नालीचे बांधकाम सुरू आहे. नवीन नाली मोठी बनली असून, थोड्या दूरवर ती रेल्वे गेटजवळ लहान नालीला जोडण्यात आली आहे. त्यामुळे मोठ्या नालीतून पाणी वाहत छोट्या नालीकडे येते. जास्त प्रमाणात पाणी असल्यास व पुढे लहान नाली असल्यामुळे उर्वरित सांडपाणी बाहेर येऊन थेट प्रभाग क्र. ८ शिवाजीनगरमधील रहिवासी शेख साबीर शेख अख्तर यांच्या घरात शिरते. यामुळे त्यांचे नुकसान होत आहे. पाण्यात सरपटणारे जंतू, कीटक घरात वाहत येत असून, कुटुंबीयांना रोगराईतून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेख साबीर शेख अख्तर यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे दिली आहे.

Web Title: Drainage in Shivajinagar during monsoon