वडनेर गंगाई ग्रामपंचायतीत नाली सफाई घोटाळा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:13 IST2021-04-22T04:13:37+5:302021-04-22T04:13:37+5:30
फोटो - येवदा २१ एस कारवाईची मागणी, सागर देशमुख यांचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन येवदा : तालुक्यातील सर्वांत मोठ्या वडनेर ...

वडनेर गंगाई ग्रामपंचायतीत नाली सफाई घोटाळा?
फोटो - येवदा २१ एस
कारवाईची मागणी, सागर देशमुख यांचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन
येवदा : तालुक्यातील सर्वांत मोठ्या वडनेर गंगाई ग्रामीपंचायतीत नाल्या सफाईमध्ये घोळ झाल्याचा आरोप ग्रामस्थ सागर देशमुख यांनी केला आहे. त्याबाबत चौकशी व कारवाईची मागणी त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे.
निवेदनानुसार, वडनेर येथील नाल्या साफ करण्यासाठी ग्रामविकास अधिकारी ढवळे यांनी ११२ मजूर लागल्याचे सांगितले होते. ३४ ट्रॉली काढण्यात आला. त्यावर ५० हजार ६०० रुपये बिल झाले. गावाची लोकसंख्या व तर गोष्टी लक्षात घेता, यामध्ये मोठा घोटाळा झाल्याचे निदर्शनास आले असल्याचे देशमुख म्हणाले. निवेदन देताना दिनकरराव देशमुख, रामदास रेठे, सुधाकर वानखडे, शाईबउल्ला खान, सुभाष कोथळकर, श्याम वानखडे, दीपक देशमुख आदी उपस्थित होते.