शंकरनगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:17 IST2021-08-25T04:17:03+5:302021-08-25T04:17:03+5:30
अंजनगाव सुर्जी : शंकरनगरातील बहुजन कॉलनी येथील नगर परिषेदेच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे लोकार्पण आ. बळवंतराव वानखडे व ...

शंकरनगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे लोकार्पण
अंजनगाव सुर्जी : शंकरनगरातील बहुजन कॉलनी येथील नगर परिषेदेच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे लोकार्पण आ. बळवंतराव वानखडे व माजी आमदार रमेश बुंदिले यांच्या हस्ते झाले. नगराध्यक्ष कमलकांत लाडोळे, उपाध्यक्ष सविता बोबळे, बांधकाम सभापती विमल माकोडे, नगर परिषद सदस्य सुनीता मुरकुटे, नगर परिषद सदस्य कृष्णा गोमासे, कंत्राटदार गणेश देशमुख, बांधकाम अभियंता दिनेश टेलकर यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा पार पडला. कार्यक्रमाला शेकडो नागरिक उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष सुशील अभ्यंकर, उपाध्यक्ष गजानन इंगळे, सचिव सिद्धांत जामनिक, सुभाष रायबोले, भूषण रायबोले, श्रीकृष्ण तायडे, राजेंद्र अभ्यंकर, शिरोमणी इंगळे व रमाई महिला मंडळ बहुजन कॉलनीच्या युवा वर्गाने आयोजनाकरिता परिश्रम घेतले.