पहूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:13 AM2021-04-15T04:13:05+5:302021-04-15T04:13:05+5:30

------------- जावरा ग्रामपंचायतमध्ये महामानवाला आदरांजली नांदगाव खंडेश्वर (अमरावती) : तालुक्यातील जावरा ग्रामपंचायतमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन ...

Dr. at Pahur. Babasaheb Ambedkar Jayanti | पहूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

पहूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

Next

-------------

जावरा ग्रामपंचायतमध्ये महामानवाला आदरांजली

नांदगाव खंडेश्वर (अमरावती) : तालुक्यातील जावरा ग्रामपंचायतमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सरपंच प्रतिभा मोहोड, उपसरपंच प्रशांत ठाकरे, अनिता नारनवरे, जयश्री पाळेकर, भारत हिवराळे, नंदू खडसे आदी उपस्थित होते.

------------

अमरावतीत वादळी वाऱ्यासह पाऊस

अमरावती : शहरासह जिल्ह्यात सायंकाळी सातच्या सुमारास अमरावती, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर तालुक्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळला. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात अर्धा तास वेगवान वारे वाहिले. इतर तालुक्यांमध्ये रिमझिम पावसाने हजेरी लावली. दुपारी कडक ऊन तापल्यानंतर सायंकाळी बरसलेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला.

------------------

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

अमरावती : शहरात विविध ठिकाणी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळून साजरी करण्यात आली. यानिमित्त इर्विन चौकात अंतराने स्टॉल लागले होते. भर उन्हात बाबासाहेबांच्या अनुयायांनी रांगेत उभे राहून अभिवादन केले.

Web Title: Dr. at Pahur. Babasaheb Ambedkar Jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.