डॉ. आंबेडकर स्मारकाच्या जागेसाठी एक कोटी रुपये देणार
By Admin | Updated: August 14, 2015 01:00 IST2015-08-14T01:00:43+5:302015-08-14T01:00:43+5:30
स्थानिक इर्विन चौक स्थित भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातील खासगी जागा संपादित करण्यासाठी महापालिका पुढाकार घेत आहे.

डॉ. आंबेडकर स्मारकाच्या जागेसाठी एक कोटी रुपये देणार
अमरावती : स्थानिक इर्विन चौक स्थित भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातील खासगी जागा संपादित करण्यासाठी महापालिका पुढाकार घेत आहे. त्याकरिता एक कोटी रुपये मंजूर केले जाणार आहे. येथे स्मारकाची निर्मिती केली जाईल, अशी माहिती महापौर चरणजितकौर नंदा यांनी दिली.
१३ मार्च २०१२ रोजीच्या स्थायी समितीच्या बैठकीत ठराव क्र. ६ नुसार शिट क्रमांक ४१ मधील भूखंड क्र. १ मधील ५८९.८७ चौ.मी. खासगी जागा पुतळा परिसर सौदर्र्यींकरणासाठी संपादित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार डॉ. आंबेडकर पुतळा परिसर सौंदर्यीकरणासाठी जागेचा. त्यानंतर भूसंपादनाच्या प्रक्रियेसाठी उपविभागीय अधिकारी यांनी अधिसूचना प्रसिद्ध करण्यापूर्वी अंदाजीत रक्कम ९९, २२, ९१० रुपये जमा करण्याचे महापालिकेला कळविले.महापालिका अंदाजपत्रकात लेखा शीर्ष क्र. ४२५ डॉ. आंबडेकर पुतळा जागा अधिग्रहणसह परिसर सौंदर्यीकरणासाठी ५० लाखांची तरतूद करण्यात आली. या शिर्ष्यातून ही रक्कम अदा करणे आणि उर्वरित रक्कम ही भूसंपादन शिर्ष्यातून वळती करण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. प्रशासनाच्या वतीने १७ आॅगस्ट रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत भूसंपादनासाठी रक्कम मंजूर करण्यात येणार आहे. १४ एप्रिलला इर्विन चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जंयतीच्या कार्यक्रमात पालकमंत्री प्रवीण पोटे, खा. आनंदराव अडसूळ, आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या उपस्थितीत प्रस्ताव प्रशासनाकडून आला.