डॉ. केशवराव पाजनकर यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:15 IST2021-08-22T04:15:19+5:302021-08-22T04:15:19+5:30
वरूड/लोणी : लोणी येथील स्व.केशवराव क्षीरसागर जागृत विद्यालयात साहित्यिक डॉ. केशव पाजनकर व निर्मला पाजनकर या दाम्पत्याचा सत्कार करण्यात ...

डॉ. केशवराव पाजनकर यांचा सत्कार
वरूड/लोणी : लोणी येथील स्व.केशवराव क्षीरसागर जागृत विद्यालयात साहित्यिक डॉ. केशव पाजनकर व निर्मला पाजनकर या दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वासुदेव पोहरकर होते. पाखर संस्थेचे संस्थापक मनोहर कोसे, जागृत नवयुवक शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष के.डी. वैद्य, दिलीप सावरकर, किशोर रत्नपारखी उपस्थित होते. याप्रसंगी सानिका दिलीपराव सावरकर हिला माध्यमिक शालांत परीक्षा मार्च-२०२० मध्ये शाळेतून प्रथम आल्याबद्दल जागृत नवयुवक शिक्षक कर्मचारी पतसंस्थेकडून स्व. वा.श. पाटील स्मृतिगौरव चिन्ह व ५०१ रुपये रोख बक्षीस के.डी. वैद्य यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. याप्रसंगी तिच्या आई-वडिलांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी, पालक उपस्थित होते. संचालन कलाशिक्षक नीळकंठ नेरकर यांनी केले. आभार मुख्याध्यापिका कमल वरघट यांनी मानले.